तुर्की- सीरियात भूकंपाचे धक्के, ४००० हजाराहून अधिकांना गमावला प्राण

 

तुर्की आणि सीरियामध्ये मागच्या २४ तासांत तीन मोठे भूकंपाचे धक्के बसले. एकापाठोपाठ एक झालेल्या भूकंपामुळे अनेक इमारती जमीनदोस्त झाल्या असून यात 3600 हून अधिक जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे.साधारण ७.८ ते ७.९ रिश्टर स्केलच्या या भूकंपांमध्ये आतापर्यंत हाती आलेल्या आकडेवारीनुसार तब्बल 3600 जणांचा बळी गेला आहे. जखमींची संख्याही मोठी आहे. इतकंच नव्हे, तर सध्याच्या घडीला मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

आतापर्यंत तुर्कीमध्ये एकाहून अधिक भूकंपाचे धक्के बसले असून, पहिला धक्का सोमवारी सकाळी बसला होता. तुर्कीमध्ये २० हून अधिक वेळा धरणी कंप जाणवले. काहींच्या म्हणण्यानुसार ४६ वेळा असे हादरे जाणवले. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार भूकंपाचं हे संकट तुर्कीसाठी भविष्यात आणखी मोठं आव्हान उभं करणारं ठरू शकतं. सध्याच्या घडीला इथं आलेल्या अतीप्रचंड तीव्रतेच्या भूकंपामुळं इमारती कोसळल्या आहेत, तर काही इमारतींचा पाया कमकुवत झाला आहे. पहिल्या भूकंपाच्या हादऱ्यामध्ये ज्या इमारतींना फारशी इजा पोहोचली नव्हती, त्या इमारती दुसऱ्या हादऱ्यामध्ये कोसळल्याचे चित्र आहे.

या भूकंपामुळे भविष्यात याठिकाणी अनेक बांधकामं धोक्यात असल्याचे चित्र आहे. थोडक्यात भूकंपाचा धक्का आला नाही, तरी इमारती कोसळून तुर्कीमध्ये आणखी जीवितहानी होऊ शकते अशी भीती वर्तवण्यात येत आहे.दरम्यान तुर्कीमध्ये आलेले संकट पाहता सध्या तिथं मदतीचा हात देण्यासाठी आणि बचावकार्यात हातभार लावण्यासाठी म्हणून गाझियाबाद येथील कमला नेहरुनगर स्थित एनडीआरएफची आठवी बटालियन तुर्कीच्या दिशेनं रवाना झाली आहे. हिंडन एअरपोर्टगून ही ५१ सदस्यी टीम मंगळवारी पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास वायुदलाच्या विमानाने तुर्कीच्या दिशेने रवाना झाल्याची माहिती आहे.

Team Global News Marathi: