तुमच्या मोबाईलमध्येही आहेत का हे धोकादायक अँप्स, लगेच डिलीट करा

 

बहुतांश कामं ऑनलाईन करणं शक्य झाल्यानं साहजिकच स्मार्टफोनचा वापर वाढला आहे. या गोष्टीचा फायदा बऱ्याचवेळा सायबर गुन्हेगार घेताना दिसतात.त्यामुळे ऑनलाइन फसवणुकीसारखे गुन्हे वाढत आहेत. लोकांची फसवणूक करण्यासाठी, डाटा आणि पैसे चोरण्यासाठी हॅकर्स सातत्यानं नवीन पद्धतीचा अवलंब करतात. त्यात मालवेअरचाही समावेश आहे.

या सर्व पार्श्वभूमीवर आता एक नवीन माहिती समोर आली आहे. ही माहिती प्रामु्ख्याने अँड्रॉइड युजर्ससाठी महत्त्वाची आहे. “अँड्रॉइड युजर्सनं काही अ‍ॅप्समध्ये मालवेअरची नवी फॅमिली आढळून आली असल्याने दक्षता बाळगावी”, असा इशारा फ्रेंच सुरक्षा संशोधकानं दिला आहे. याबाबतची सर्व माहिती या संशोधकाने ट्विटरवर शेअर केली आहे. `जनसत्ता`ने या विषयीचं वृत्त दिलं आहे.

अँड्रॉइड युजर्स पुन्हा एकदा संकटात सापडले आहेत. काही अ‍ॅप्सच्या अनुषंगाने एका फ्रेंच सुरक्षा संशोधकानं अँड्रॉइड युजर्सना अलर्ट केलं आहे. या अ‍ॅप्समध्ये मालवेअरची नवी फॅमिली अर्थात नवा प्रकार असू शकतो, असा इशारा त्यानं दिला आहे. अशा 8 अ‍ॅप्सची माहिती मॅक्झिम इंग्रोया संशोधकानं ट्विटरवर दिली आहे. मागील जूनपासून या अ‍ॅप्सचं ट्रॅकिंग सुरु असल्याचं मॅक्झिम यांनी सांगितलं.

ही 8 अ‍ॅप्स 30 लाखांपेक्षा जास्त वेळा (गुगल प्लेवरील संख्या मिळून) डाउनलोड केली गेली आहेत. यात ऑटोलायकॉस हे नवं मालवेअर आढळून आलं आहे. हा मालवेअर तुमचं डिव्हाइस कसं संक्रमित करू शकतं हे मॅक्झिमने ट्विटर थ्रेडद्वारे स्पष्ट केलं आहे. ही 8 अ‍ॅप्स अत्यंत धोकादायक आहेत, असं देखील या संशोधकानं म्हटलं आहे.

यात व्ह्लॉग स्टार व्हिडिओ एडिटर हे अ‍ॅप 10 लाख वेळा, क्रिएटिव्ह 3 डी लॉंचर हे अ‍ॅप 10 लाख वेळा, फनी कॅमेराहे अ‍ॅप 50 हजारपेक्षा अधिक वेळा, वॉव ब्युटी कॅमेरा हे अ‍ॅप 1 लाख वेळा, जीआयएफ इमोजी कीबोर्ड,रेझर कीबोर्ड अ‍ॅण्ड थीम (गेमिंग – टेक कंपनी रेझरशी संबंध नाही) हा अ‍ॅप 10 हजार वेळा, फ्री ग्लो कॅमेरा 1.0.0 अ‍ॅप 5 हजारवेळा, तर कोको कॅमेरा V1.1 हे अ‍ॅप एक हजारवेळा डाउनलोड केलं आहे.

आदित्य ठाकरेंनी उभारलेला लोखंडी पूल पुराच्या पाण्यात गेला वाहून

“उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांचं नाव पुरतं घालवलं, सुप्रीम कोर्टातही इज्जत गेली”

Team Global News Marathi: