Monday, November 28, 2022

आजचे राशीभविष्य – नवीन कार्य सुरू करण्यासाठी आज अनुकूलता लाभेल; आर्थिक लाभ होतील

आजचे राशीभविष्य – नवीन कार्य सुरू करण्यासाठी आज अनुकूलता लाभेल; आर्थिक लाभ होतील

मेष- आज चंद्र रास बदलून मकर राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र दशमात स्थानी असेल. आज नोकरीत वरिष्ठां बरोबर महत्वाच्या विषयावर चर्चा होऊन आपण आखलेल्या योजनेला सरकार कडून फायदा होईल. कार्यालयीन कामासाठी प्रवास घडतील. कुटुंबात आनंदी वातावरण राहील. घराच्या सजावटीकडे लक्ष द्याल व त्यात बदल करून वातावरण प्रसन्न बनवाल.

वृषभ- आज चंद्र रास बदलून मकर राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र भाग्यात स्थानी असेल. आजचा दिवस मिश्र फलदायी आहे. व्यापारी आपल्या व्यापारात भांडवल घालून नवीन कामे सुरू करतील व भविष्यातील योजना ठरवतील. परदेशी प्रवास घडतील.

मिथुन- आज चंद्र रास बदलून मकर राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र अष्टमात स्थानी असेल. आज अनियंत्रित रागाला लगाम घालावा लागेल. बदनामी व नकारात्मक विचारांपासून दूर राहणे हिताचे ठरेल. खर्च अधिक झाल्याने आर्थिक चणचण भासेल. कुटुंबीय व कार्यालयातील सहकारी यांच्याशी मतभेद किंवा वादविवादाचे प्रसंग येतील.

कर्क- आज चंद्र रास बदलून मकर राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र सातवा स्थानी असेल. आजचा दिवस सामाजिक व व्यावसायिक क्षेत्रांत आपणाला लाभदायक ठरेल. मौज – मजेची साधने, उत्तम दागीने व वाहन खरेदी होईल. मौज – मस्ती व मनोरंजनात वेळ खर्च होईल.

सिंह- आज चंद्र रास बदलून मकर राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र सहावा स्थानी असेल. आज आपले मन चिंतेने व्यग्र असेल. एक प्रकारची उदासीनता येईल. दैनंदिन व्यवहारात विघ्न येऊ शकतात. सहकार्‍यांचे सहकार्य आज अजिबात मिळणार नाही.

कन्या- आज चंद्र रास बदलून मकर राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र पाचवा स्थानी असेल. आज आपणाला संतती समस्येमुळे चिंता राहील. अपचना सारख्या पोटाच्या तक्रारी राहतील. विद्यार्थ्यांना अभ्यासात अडथळे येतील. बौद्धिक चर्चा व वाद – विवादात सहभागी होऊ नका. प्रिय व्यक्तीचा सहवास घडेल.

तूळ- आज चंद्र रास बदलून मकर राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र चवथा स्थानी असेल. आज शारीरिक थकवा व मानसिक दृष्टया आपण व्यस्त राहाल. माते विषयी चिंता राहील. स्थावर संपत्ती विषयीचे व्यवहार सांभाळून करावे लागतील. शक्य असेल तर प्रवास टाळा.

वृश्चिक- आज चंद्र रास बदलून मकर राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र तिसरा स्थानी असेल. आजचा दिवस लाभदायी आहे. आर्थिक लाभ होतील. नशिबाची साथ मिळेल. मित्रां बरोबरच्या संबंधात सौहार्दता असेल. नवीन कार्य सुरू करण्यासाठी आज अनुकूलता लाभेल. एखादा प्रवास ठरवाल.

धनु- आज चंद्र रास बदलून मकर राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र दुसरा स्थानी असेल. आज आपल्या मनाची अवस्था द्विधा होईल. कौटुंबिक वातावरण क्लेशदायी राहील. ठरलेली कामे पूर्ण न झाल्याने मन हताश होईल. आज एखादा महत्वपूर्ण निर्णय न घेणे उचित ठरेल.

मकर- आज चंद्र रास बदलून मकर राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र प्रथम स्थानी असेल. आज सकाळी आपले मन प्रफुल्लित असेल. आज एखादे मंगलकार्य आपण करू शकाल. वातावरण मंगलमय बनेल. मित्र, स्नेही यांच्याकडून आपणास भेटवस्तू मिळतील. व्यापार- व्यवसायात आपले वर्चस्व राहील.

कुंभ- आज चंद्र रास बदलून मकर राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र बारावा स्थानी असेल. आज मन व शरीर अस्वस्थ राहील. कुटुंबियाशी मतभेद संभवतात. आर्थिक देवाण – घेवाण किंवा गुंतवणूक करताना सावध राहावे. कोर्टाच्या कामात सुद्धा सावध राहावे लागेल. खर्च वाढेल.

मीन- आज चंद्र रास बदलून मकर राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र लाभात स्थानी असेल. आज आपण कौटुंबिक व सामाजिक सोहळ्यात सहभागी व्हाल. मित्रांचा सहवास घडेल. त्यांच्यासाठी खर्च सुद्धा करावा लागेल. एखाद्या रम्य स्थळी सहलीसाठी जाऊ शकाल.