आज बाळासाहेब असायला हवे होते – राज ठाकरे

आज बाळासाहेब असायला हवे होते – राज ठाकरे

अयोध्या येथे आज रामचंद्रांच्या मंदिराच्या भूमिपूजनाचा सोहळा पार पडणार आहे. या सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह देशातील मोजकेच मान्यवर उपस्थित राहणार आहे. शिवसेनेसह महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं सुद्धा यावर आनंद व्यक्त केला आहे.

यावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आनंद व्यक्त करत आपल्या पात्रातून भावना व्यक्त केल्या आहेत.या पात्रात राज ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे. या पत्रात राज ठाकरे लिहितात, या क्षणी आपल्याला बाळासाहेब ठाकरेंची आठवण येते आहे, या मंगलप्रसंगी ते असायला हवे होते. त्यांना मनापासून आनंद झाला असता.

राज ठाकरे पुढे लिहीतात, उद्या राममंदिराचे अयोध्येत भूमिपूजन होणार, स्वतंत्र भारताच्या इतिहासातील जे काही मोजके मंगलमय क्षण आहेत त्यातील हा एक क्षण आहे. अयोध्येत उभे राहणारे राममंदिर हे नेहमीचं मंदिर नाही, ते प्रतीक आहे शतकानुशतके हिंदू बांधवांच्या मनात सुरु असलेल्या त्राग्याचे, अगतिकतेचे, ते प्रतीक आहे कोट्यावधी हिंदू बांधवांच्या अचाट इच्छाशक्तीचे, सहनशीलतेचे आणि म्हणूनच ह्या क्षणाचे महत्व वेगळं आहे.

तीन दशकांचा संघर्ष साधा नव्हता, त्यात अनेक करसेवकांना आणि जनसामान्यांना जीव गमवावा लागला, आज त्या करसेवकांच्या आणि जनसामान्यांच्या आत्म्याला खऱ्या अर्थाने सद्गगती मिळेल. ह्यासाठी नेटाने न्यायालयीन लढाई असो की सर्वसहमतीचं वातावरण निर्माण करण्यासाठी श्री. नरेंद्र मोदी ह्यांच्या सरकारने जे प्रयत्न केले ते निश्चितच वाखाणण्यासारखे आहेत आणि त्याबद्दल त्यांचं मनापासून अभिनंदन.” असंही राज ठाकरे यांनी पत्रात म्हटलंय.

ग्लोबल न्युज नेटवर्क: