मोदी या शब्दाचा अर्थ “लोकशाहीची हत्या” असा होतो

मोदी या शब्दाचा अर्थ “लोकशाहीची हत्या” असा होतो

पश्चिम बंगाल मध्ये पार पडणाऱ्या विधान सभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तृणमूल काँग्रेस आणि भारतीय जनता पक्षात शाब्दिक युद्ध पाहावयास मिळत आहे. त्यात भाजपने बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेस मधील अनेक मतबल नेत्यांनी भाजपात प्रवेश केला आहे. त्यामुळे चवताळलेल्या ममतादिनींनी मोदी आणि शहा यांच्यावर जोरदार टीका केली आहे.

दरम्यान, तृणमूल काँग्रेसचे नेते मदन मित्रा यांनी भाजपवर जोरदार टीका केली एका प्रचारसभेमध्ये ते बोलत होते. मित्रा म्हणाले ‘ मोदी या शब्दाचा अर्थ ‘लोकशाहीची हत्या’ असा होतो. तुम्ही जर आम्हाला दूध मागितलं तर आम्ही खीर देऊ पण बंगाल मागितलं तर तुम्हाला चिरुन टाकू,’ असं म्हणत त्यांनी मोदी सरकारवर जोरदार टीका केली आहे.

ममता बॅनर्जी यांनी आगामी विधानसभा निवडणूक नंदीग्राममधून लढवणार असल्याचं जाहीर केलं आहे. नंदीग्राम हा शुभेंद्रू अधिकारी यांचा बालेकिल्ला समजला जातो. त्यामुळे यंदा नंदीग्रामची निवडणूक लक्षवेधी होणार आहे.

ग्लोबल न्युज नेटवर्क: