जगावर किरणोत्सर्गाचा धोका वाढला! युरोपातील सर्वात मोठ्या अणुभट्टीवर रशियाचा हल्ला

नवी दिल्ली : युरोपातील सर्वात मोठ्या अणुऊर्जा प्रकल्पावर हल्ला झाल्याची माहिती समोर आली आहे. रशियाने झापोरीझ्या (Zaporizhzhia plant) अणुऊर्जा प्रकल्पावर हल्ला केल्याचा दावा युक्रेनच्या परराष्ट्रमंत्र्यांनी केलाय.

 

जगाला ज्या गोष्टीची भीती होती. ती आता घडतेय की काय अशा घडामोडी सध्या रशिया युक्रेन युद्धादरम्यान घडत आहेत. युरोपातील सर्वात मोठा अणुऊर्जा प्रकल्पावर हल्ला केल्याचा आरोप युक्रेनच्या परराष्ट्रमंत्र्यांनी म्हटलं आहे.

अणुऊर्जा प्रकल्पावर गोळीबार केल्याने रेडिएशनची लेवल वाढल्याचाही दावा करण्यात आलाय. हा प्रकल्प सर्वात मोठा असून, स्फोट झाल्यास चेरनोबिलपेक्षा दहापट नुकसान होण्याची शक्यता आहे. यामुळे कोट्यवधींचीही मनुष्यहानीही होऊ शकते.

ग्लोबल न्युज नेटवर्क: