इंदापूर तालुक्यात आढळली अफुची शेती, पोलिसांनी दाखल केला गुन्हा !

 

भुईमुग आणि लसूण या पिकांमध्ये आंतरपीक म्हणून अफू या अंमली पदार्थांच्या काही झाडांची लगवड केल्याचा धक्कादायक प्रकार पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यात उघडकीस आला आहे. इंदापूर तालुक्यातील वरकुटे बुद्रुक येथे हा प्रकर उघडकीस आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोघांवर गुन्हा दाखल करुन 2 लाख 11 हजार 300 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.

या प्रकरणी दोन व्यक्तींवर यांच्याविरुद्ध अंमली औषधिद्रव्य व मन:प्रभावी पदार्थ अधिनियम कायद्यानुसार इंदापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस हवालदार सुरेंद्र जयवंत वा यांनी फिर्याद दिली आहे. दोन शेतकऱ्यांच्या शेतातील विहिरीच्या कडेला ही अफूची झाडे भुईमुग आणि लसूण या पिकांमध्ये आंतरपीक म्हणून लागवड केल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले.

अफूचे (खसखस) ओल्या झाडाचे व बोंडाचे एकूण वजन ३२ किलोग्रॅम असून, अफूच्या बोडांसह झाडांची एकूण किंमत अंदाजे 2 लाख 11 हजार 300 रुपये आहे. पोलिसांनी दोघांवर गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पोलीस पुढील तपास करत आहे.

Team Global News Marathi: