अनेक कुटुंबांचा आधारवड ऋषितुल्य व्यक्तिमत्त्व-डॉ वेदप्रकाश पाटील

अनेक कुटुंबांचा आधारवड ऋषितुल्य व्यक्तिमत्त्व-डॉ वेदप्रकाश पाटील

उस्मानाबाद : आज मराठवाडा,गोवा, आसाम, छत्तीसगड आदी राज्यात भैरवनाथ निसर्ग मंडळ या संस्थेच्या माध्यमातून शिक्षणाची गंगा खेड्यापाड्यात फोहचवणारे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष तथा ज्यांच्या पायावर नेहमी आपला माथा टेकून ठेवावा असं ऋषीतुल्य व्यक्तिमत्व म्हणजे डॉ. वेदप्रकाश पाटीलसाहेब यांचा वाढदिवस…..

त्यांच्या वाढदिवसानिमित्त केलेला लेखनप्रपंच

डॉ. वेदप्रकाश पाटीलसाहेब यांचा जन्म २ जानेवारी १९४२ रोजी शेतकरी,सधन व सुशिक्षित कुटुंबात झाला. त्यांचे वडीलही त्याकाळात वकील होते. परंतु शिक्षण हेच समाज विकासाचे माध्यम आहे हे लक्षात घेऊन त्यांनी देखील उच्च शिक्षण घेतले आणि कृषी क्षेत्रातील सर्वोच्च पदवी म्हणजे पीएचडी त्यांनी प्राप्त केली. सोबतच कायद्याचे ज्ञान प्राप्त करण्यासाठी त्यांनी एल.एल.एम.पूर्ण केले. त्यांनी आपल्या शासकीय सेवेचा अधिव्याख्याता पासून सुरू केलेला प्रवास ते कुलगुरू या सर्वोच्च पदापर्यंत झाला.

स्वर्गीय वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे दोन वेळा कुलगुरू म्हणून काम करण्याची संधी मिळाली तसेच छत्तीसगड राज्यात इंदिरा गांधी कृषि विश्वविद्यालय या ठिकाणीदेखील कुलगुरू म्हणून काम केले तसेच अखिल भारतीय कुलगुरू परिषदेच्या अध्यक्ष पदावर ही त्यांनी काम केले आहे. इतकी मोठी उंची असूनही कधीही त्यानी कोणत्याही गोष्टीचा गर्व किंवा दुराग्रह केला नाही आपले पाय नेहमी जमिनीवर ठेवून कायम काम करीत राहिले म्हणूनच आज संस्थेचा वटवृक्ष झालेला आपणास पाहायला मिळतो.

कर्मचाऱ्यांशी संस्थापकांची वागणूक कशी असावी हे पाहायचे असेल तर आदरणीय साहेबांचं वर्तन हे इतर सर्वांना आदर्शवत असेच आहे. ज्यावेळी एखादा कर्मचारी चांगलं काम करतो त्याचं तोंड भरून कौतुक ते करतात तर एखाद्या कर्मचाऱ्याची चूक झाली तर त्याला ते रागवतात व ती चूक दुरुस्त झाली की ते रागवणे हे त्या क्षणापुरते असते. ती चूक दुरुस्त झाली की परत मनात कुठलाही पूर्वग्रहदूषित दृष्टिकोन न ठेवता ते लगेच पुढच्या गोष्टीकडे वळतात.आज संस्थेत एवढे कर्मचारी आहेत मात्र सर्व कर्मचाऱ्यांना त्यांच्या सहवासाची संधी मिळाली नाही मात्र मी त्यातील एक मोठा भाग्यवान व्यक्ती आहे त्यांचा सहवास व मार्गदर्शन मला गेल्या बारा वर्षापासून सातत्याने मिळत आहे.

आज कळंब येथील डी.एड. कॉलेज चालू असण्याचे मुख्य कारण म्हणजे ज्यावेळी आमचे प्रवेश पूर्ण होतात मोठ्या साहेबांची एक शाबासकीची थाप मिळावी म्हणून आम्ही ते प्रवेश पूर्ण करण्यासाठी अहोरात्र झटत असतो. ते शाबासकीची थाप तर देतातच मात्र संस्थेच्या इतर महाविद्यालयात किंवा शैक्षणिक संस्थेत देखील ते आमच्या कॉलेजचे उदाहरण देतात.त्यामुळे आपसूकच आपल्याला काम करण्यास प्रेरणा मिळते विशेष म्हणजे आज त्यांच्या वयाची ऐंशी पूर्ण होत असतानाही त्यांची स्मरणशक्ती अफाट आहे.वाचनाची आवड आजही ते जोपासत आहेत. आधुनिक काळात जे नवनवीन तंत्रज्ञान येतात ते देखील समजून घेण्याची त्यांची आजही ओढ दिसून येते.

त्यामुळे एखाद्या व्यक्तीला जर जीवनात आदर्शवत जीवन जगायचे असेल तर त्यासाठी डॉ.वेदप्रकाश पाटील साहेब उर्फ मोठे साहेब यांच्या इतका आदर्श व्यक्ती माझ्या तरी पाहण्यात नाही.

ते किती जमिनीवर आहेत याचं एक माझ्यासमोर घडलेलं उदाहरण म्हणजे 8 नोव्हेंबर 2016 रोजी नोटबंदी झाली आणि आम्ही त्या वेळी उस्मानाबाद तालुक्यातील वाघोली या गावात त्यांच्या मित्रांना भेटायला गेलो होतो. त्यावेळी परत येताना मी नोट बंदीचा नवीन झालेला निर्णय त्यांना सांगितला तर त्यावेळी त्यांनी बातमी पूर्ण समजून घेतली आणि एकच उत्तर दिलं. आपल्यासारख्या सर्वसामान्यांना याची अडचण नाही मात्र जे मोठे लोक आहेत त्यांच्यासाठी मात्र ही गोष्ट अडचणीची ठरू शकते यावरून आपल्याला समजू शकतं की मोठेपणा हा वागण्यात असून चालत नाही तर तो मनाचा मोठेपणा असावा लागतो.

डॉ.वेदप्रकाश पाटील साहेब यांच्या पूर्ण कार्यावर प्रकाश टाकण या लेखातून शक्य नाही मात्र त्यांच्या जीवनातील काही भाग त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सांगितला आहे.

पुनश्च एकदा मोठ्या साहेबांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा….

लेखकप्रा.सतिश मातने (प्राचार्य भैरवनाथ अध्यापक विद्यालय, कळंब)

ग्लोबल न्युज नेटवर्क: