तेजस्वीने दिलेली लढत व मिळवलेले यश राजकारणातील तरुण पिढीसाठी प्रेरणा ठरणार- शरद पवार

पुणे – बिहार निवडणुकीत आम्ही जाणीवपूर्वक लक्ष घातले नाही : शरद पवार

बिहार निवडणुकीत आम्ही जाणीवपूर्वक लक्ष घातले नाही, निवडणूक मुख्यत्वे नितीश कुमार विरुद्ध तेजस्वी यादव अशी होती. तेजस्वीला संपूर्ण मोकळीक मिळावी म्हणून आम्ही या निवडणुकीसाठी लांब राहिलो. ज्या पद्धतीने तेजस्वीने लढत दिली. यश मिळवले ते आगामी काळात राजकारणातील तरुण पिढीसाठी प्रेरणा ठरणारं आहे.

बिहारमध्ये आमच्या अपेक्षेप्रमाणे निकाल लागला नाही हे खरं आहे. देवेंद्र फडणवीस यांच्यामुळे बिहारमध्ये चमत्कार झाला. हा प्रकाश आमच्या डोक्यात पत्रकारांमुळेच पडला आहे. बीजेपीच्या जागा जास्त आहे, पण नितीशकुमार यांचे नुकसान होईल असे वाटत होते तसे झाले नाही.

राज्यपालांनी अर्णवबद्दल चिंता व्यक्त केली. हे चांगले आहे. पण मला वाटते की, ज्यांच्या घरात दोन आत्महत्या झाल्या आहेत. त्यांच्याबद्दल राज्यपालांनी चिंता व्यक्त केली असते तर चांगले झाले वाटले असते. अन्वय नाईक यांच्या सोबत चा माझा फोटो पाच वर्षा पूर्वीचा आहे. अमेरिेकेचे निकाल स्पष्ट आहेत. असं असताना ट्रम्प यांचं वागणं त्यांच्या पदाला आणि वयाला शोभणारे नाही.

 

ग्लोबल न्युज नेटवर्क: