शेअर बाजार गडगडला; तीन लाख कोटी बुडाले

कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढू लागल्याचा परिणाम जगभरातील शेअर बाजारांवर दिसू लागला आहे. मुंबई शेअर बाजार आज गडगडला. एसबीआय, रिलायन्स, ऑक्सिस बँक, एचडीएफसी आदींचा शेअर्सचा भाव तीन टक्क्यांनी घसरला तर महिंद्राचा शेअर्स सर्वाधिक चार टक्यांनी घसरला. शेअर्सचा भाव गडगडल्याने एकाच दिवसात सुमारे तीन लाख कोटी बुडाले.

मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स 871 अंकांनी घसरून 49,180.31 वर बंद झाला. यापूर्वी 26 फेब्रुवारी रोजी सेन्सेक्स 49099 वर बंद झाला होता. सेन्सेक्समध्ये समाविष्ट असलेले 30 पैकी 28 शेअर्स गडगडले. मुंबई शेअर बाजारात 3124 शेअर्समध्ये आज कारभार झाला. त्यातील 837 शेअर्सचा भाव वाढला तर 68 टक्के म्हणजेच 2119 शेअर्स गडगडले. लिस्टेड कंपन्यांचा मार्पेट क@प 3.2 लाख कोटी रुपयांनी खाली आला.

मुंबई शेअर बाजाराप्रमाणेच राष्ट्रीय शेअर बाजार निफ्टीही 265 अंकांनी घसरून 14549.40 वर बंद झाला.कोरोनाचा कहर वाढल्याने जागतिक शेअर बाजारातही घसरण दिसून येत आहे. अमेरिकेतील शेअर बाजाराला मोठा फटका बसला असून हाँगकाँग, चीन, जपानसह जगभरातील शेअर बाजारांमध्ये दोन टक्के घसरण दिसून आली.

साभार सामना ऑनलाइन

ग्लोबल न्युज नेटवर्क: