बंदुकीचा धाक दाखवून दरोडेखोरांनी कारसह रोख रक्कम घेऊन लुटले

तुळजापूर, दि. 30 : औसा-तुळजापूर महामार्गावर बुधवारी पहाटेपूर्वी अज्ञात पाच अनोळखी दरोडेखोरांनी कार आडवून बंदुकीचा धाक दाखवून रोख रक्कम, दोन मोबाईल व कार घेऊन गेल्याची खळबजनक घटना घडली आहे. त्याचबरोबर कारचालकास रस्त्याच्या लगत शेतातील चिंचेच्या झाडाला बांधुन दरोडेखोर पसार झाले.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, रमाकांत लक्ष्मण सोनकांबळे, रा. वाकडी, जि. रायगड हे दि. 29 सप्टेंबर रोजी रात्री 02.30 वा.सु. औसा – तुळजापूर रस्त्याने हुंदाई आय- 20 स्पोर्ट कार एम.एच. 04 एफएफ 591 ही चालवत जात होते. प्रवासा दरम्यान टोलनाक्यापासुन साधारण 20 कि.मी. अंतरावर अनोळखी 5 व्यक्तींनी रमाकांत सोनकांबळे यांना कार बाजूस घेण्यास सांगुण बंदुकीचा धाक दाखवून, “आवाज करुन नको नाहीतर गोळी घालीन.

तुझ्या जवळ जेवढे पैसे आहेत ते सर्व आम्हाला दे” असे धमकावून रमाकांत यांच्याजवळील ओपो- 11 प्रो व सॅमसंग जे-7 हे दोन मोबाईल फोनसह रोख रक्कम 8,000/-रु. काढून घेतले. तसेच रमाकांत यांना त्यांच्याच कारमध्ये बसवून तुळजापूर पासुन 10 कि.मी. अंतरावर नळदुर्ग रस्त्यालगत असलेल्या शेतातील चिंचेच्या झाडाला बांधुन त्यांची नमूद हुंदाई कार घेउन गेले. अशा मजकुराच्या रमाकांत सोनकांबळे यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 395, 342 अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

ग्लोबल न्युज नेटवर्क: