जीवे मारण्याच्या धमक्या दिल्याप्रकरणी सक्षणा सलगर सहित तीन कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल.

जीवे मारण्याच्या धमक्या दिल्याप्रकरणी सक्षणा सलगर सहित तीन कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल.

प्रतिनिधी: धनगर समाजाचे आंदोलनकर्ते व मेंढपाळ यांच्यासाठी काम करणारे कार्यकर्ते संतोष बिचुकले व गेल्या ४ महिन्यात कोरोनाच्या कार्यकाळात स्वतःच्या जीवाची पर्वा न करता महाराष्ट्रात विविध भागात मेंढपाळांवर जे हल्ले होत आहेत त्यांना न्याय मिळवून देण्याचे काम त्यांनी केले आहे.

संतोष बिचुकले हे कोणत्याही पक्षाशी निगडित नाही. तरी मेंढपाळांना न्याय मिळवून देत आहे याच गोष्टीचा आकस मनात धरून संतोष बिचुकले यांना कोणताही राजकीय पक्ष पद देऊ शकते आणि धनगर समाजात व मेंढपाळात त्यांची उंचावत चाललेली प्रतिमा या गोष्टीचा आकस मनामध्ये धरून राष्ट्रवादी युवती प्रदेशाध्यक्षा सक्षणा सलगर व तिच्या कार्यकर्त्यांनी फेसबुक व्हाट्सअप सोशल मीडियाच्या माध्यमातून संतोष बिचुकले यांना केल्या ४ महिन्यापासून बदनाम केले जात आहे.

त्यांना जिवे मारण्याच्या धमक्या दिल्या जात आहेत. तसेच खोट्या गुन्ह्यात अडकवून त्यांची सामाजिक प्रतिमा म्हणून करण्याच्या हेतूनेच हा प्रकार केला जात आहे. समाज भावना लक्षात घेता संतोष बिचुकले यांनी गेल्या चार महिन्यापासून कोणतीही तक्रार केली नाही. परंतु हे प्रकार वाढत चालल्याचे असल्याचे पाहून त्यांनी अखेर हडपसर पोलीस स्टेशन पुणे येथे सक्षणा सलगर, प्राजक्ता कलगुंडे, सोमनाथ मदने, प्रकाश नरवटे यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला असून त्यांना कोर्टात खेचणार असल्याची माहितीही त्यांनी आमच्या प्रतिनिधीला दिली.

ग्लोबल न्युज नेटवर्क: