केंद्राची ठाकरे सरकारला केराची टोपली, विद्यापीठाच्या परीक्षा होणार

केंद्राची ठाकरे सरकारला केराची टोपली, विद्यापीठाच्या परीक्षा होणार

कोरोनाच्या वाढत्या संकटात विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळण्याचे केंद्र सरकारने आता निश्चितच केले आहे. सध्या कोरोनाच्या वाढत्या संकटात केंद्र सरकारने विद्यापीठाच्या परीक्षा घेण्याचे ठरविले आहे याबाबत सर्व राज्यांना पत्रकाद्वारे कळवण्यात आले आहे. युजीसीच्या गाईडलाईन्सनुसार या परीक्षा घेण्यास केंद्रीय गृहमंत्रालयाने विद्यापीठांना परवानगी दिली आहे.

मागील अनेक दिवसापासून राज्य सरकार आणि राज्यपाल कोश्यारी यांच्याती यूजीसीच्या परीक्षां घेण्याबाबत वाद विवाद होत असताना दिसत होते. यावर राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांडे नाराजी सुद्धा व्यक्त केली होती. मात्र आता या संदर्भात एक पत्र केंद्रीय गृहमंत्रालयाने केंद्रीय उच्च शिक्षण सचिवांना दिले आहे. यामुळे आघाडी सरकारने जरी परीक्षा रद्द केलेली असली तरीही विद्यापीठांनापरीक्षा घ्याव्या लागणार असल्याचे दिसत आहे.

कोरोनच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे तसेच लॉकडाउनच्या कार्यकाळात अनेक ठाकरे सरकारने आपल्या राज्यातील विद्यापीठांच्या परीक्षा रद्द केल्या होत्या. महाराष्ट्र सरकारने सुद्धा विद्यापीठांच्या शेवटच्या वर्षाच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय जाहीर केला होता. त्यानंतर आता केंद्रीय गृहमंत्रालयाने विद्यापीठांच्या परीक्षा घेण्यास परवानगी दिली आहे.

ग्लोबल न्युज नेटवर्क: