सोन्याच्या भावात घसरण सुरूच; चांदीच्या दरात किरकोळ तेजी

सोन्याच्या किंमतीमध्ये गेल्या काही दिवसांपासून घसरण सुरू आहे. गुरुवारी देखील सोन्याचा भाव 320 रुपयांनी कोसळला. सोन्याचा दर आता 46 हजारांच्याही खाली आला आहे. तर दुसरीकडे चांदीच्या भावात मात्र नाममात्र तेजी पाहायला मिळाली.

 

दिल्ली सराफा बाजारामध्ये बुधवारी सोन्याचा दर 46 हजार 187 रुपये होते. गुरुवारी हा दर 320 रुपयांनी खाली आला आणि 10 ग्रॅम (एक तोळा) चा भाव 45 हजार 867 रुपयांवर स्थिरावला. तर चांदीच्या दरात 28 रुपयांची वाढ झाली असून एक किलोचा भाव 68 हजार 283 रुपये झाला आहे.

ठळक बातम्या : अमरावती, यवतमाळ, अकोला जिल्ह्यांत कोरोना प्रादुर्भाव असलेल्या भागात तातडीने कंटेनमेंट झोन जाहीर करासार्वजनिक आयोजनांचे नियम मोडणाऱ्यांवर दाखल होणार गुन्‍हे, महापालिका आयुक्ताचे सक्‍त आदेशIPL2021 –‘हा’खेळाडू झाला कोट्यधीश, बेसप्राईजच्या 20 पट अधिक रक्कम मिळालीप्रेम म्हणजे प्रेम असतं…तरुणाने केला तृतीयपंथीयाशी विवाहIPL2021 –पंजाबने तब्बल 25 पट अधिक बोली लावलेला शाहरूख खान कोण आहे?IPL2021 –कानामागून आला अन…‘या’वेगवान गोलंदाजासाठी लागली 14 कोटींची बोली


कस्टम ड्यूटीमध्ये कपात

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारमण यांनी 1 फेब्रुवारीला अर्थसंकल्प सादर केला. यात सोन्याच्या आयातीवरील आयात शुल्कात (कस्टम ड्यूटी) कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला. सोन-चांदीच्या आयात शुल्कात 5 टक्के कपात करण्यात आली. याआधी सोने-चांदीवर 12.5 टक्के आयात शुक्ल द्यावे लागत होते, तर कमी करून आता 7.5 टक्के करण्यात आले आहे. यामुळे सोन्याचे भाव कमी होत आहेत.

 

गेल्या वर्षी 28 टक्के वाढ

2020 हे वर्ष सोन्याच्या किंमतीसाठी शानदार ठरले. गेल्या वर्षी सोन्याच्या दरात तब्बल 28 टक्के वाढ झाल्याचे पाहायला मिळाले. ऑगस्ट महिन्यात सोन्या-चांदीच्या किंमती विक्रमी स्तरावर गेल्या होत्या. मात्र त्यानंतर यात घसरण पाहायला मिळत आहे.

ग्लोबल न्युज नेटवर्क: