तामिळनाडूत भाजप नेत्याची अज्ञाताकडून हत्या, पोलिसांकडून तपास सुरु

 

तामिळनाडू | तामिळनाडूमधील भाजप नेत्याची अज्ञात हल्लेखोरांनी हत्या केली आहे. भाजप नेत्याच्या हत्येमुळे शहरात पुन्हा कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. भाजपचे एसी/एसटी शाखेचे जिल्हा अध्यक्ष बालचंद्रन यांची ३ अज्ञात हल्लेखोरांनी हत्या केली. मंगळवारी चेन्नईच्या चिंताद्रिपेट भागात घटना घडली आहे. बालचंद्रन यांना राज्य सरकारकडून सुरक्षा प्रदान करण्यात आली होती. त्यांना जिवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. मंगळवारी ते चहा पिण्यासाठी पीएओ बाहेर गेले होते. यावेळी तीन अज्ञातांनी नेत्याची हत्या केली आहे. दिलेल्या माहितीनुसार तीन आरोपी बाईकवरुन आले आणि हत्या करुन फरार झाले आहेत.

भाजप नेते बालचंद्रन यांच्या हत्येनंतर पोलिसांकडून फरार आरोपींचा शोध सुरु करण्यात आला आहे. एक विशेष टीम तयार केली असून तपास सुरु केलाय. चेन्नई पोलीस कमिश्नर शंकर जीवल घटनास्थळी दाखल झाले होते. यावेळी ते म्हणाले की, कुठे काही चूक झालंय का पाहण्यासाठी घटनास्थळी आलो आहे. प्रत्यक्षदर्शींकडून माहिती घेण्यात आली आहे. सध्या हत्या करण्यात आली असून यामागे पूर्व वैमनस्य असल्याची शंका आहे.

ज्या भागात बालचंद्रन यांची हत्या करण्यात आली. त्या भागातील सर्व सीसीटीव्ही फुटेजची तपासणी पोलिसांकडून करण्यात येत आहे. तामिळनाडूचे विरोधी पक्षनेते पलानस्वामी यांनी भाजप नेत्याच्या हत्येचा निषेध केला आहे. तसेच राज्य पोलिसांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

Team Global News Marathi: