ममता बॅनर्जी यांचा पराभव करणारे सुवेंदू अधिकारी यांची विरोधी पक्षनेते पदी निवड !

पश्चिम बंगालमध्ये जरी तृणमूल काँग्रेस विजय झाला असलातरी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना निवडणुकीला पराभवाला सामोरे जावे लागले होते. त्यांना भारतीय जनता पक्षाचे उमेदवार सुवेंदू अधिकारी यांनी ममता दीदींचा पराभव केला होता. आता अधिकारी यांच्यावर भाजपने मोठी जबाबदारी सोपवली आहे. भारतीय जनता पक्षाने सुवेंदू अधिकारी यांची विधानसभेतील विरोधी पक्षनेते म्हणून नियुक्ती केली आहे.

या नियुक्तीमुळे पुन्हा एकदा भाजपने ममता बॅनर्जी यांना घेरण्याचा प्लॅन आखला आहे. निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार, सुवेंदू अधिकारी यांनी नंदीग्राम मतदारसंघातून ममता बॅनर्जी यांना १९५६ मतांनी पराभूत केले. निवडणुकीत सुवेंदू अधिकारी यांना एकूण १०९६७३ मते मिळाली, तर ममता बॅनर्जी यांना १०७९३७ मते मिळाली. मात्र आद्यपही ममता बॅनर्जी यांनी आपला पराभव मेनी न करता कोर्टात जाण्याची तयारी दर्शवली आहे.

पश्चिम बंगालमधील विधानसभेच्या २९४ जागांपैकी २९२ जागांवर ८ टप्प्यात मतदान झाले. २ मे रोजी भारतीय जनता पक्षाने या निवडणुकीत ७७ जागा जिंकल्या, गेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी केवळ तीन जागा जिंकल्या. त्याचवेळी तृणमूल कॉंग्रेसने २१३ जागा जिंकल्या आणि बहुमत मिळवले. त्याचवेळी डाव्या आणि इतरांना १-१ जागा मिळाली आहे. दोन मतदारसंघात उमेदवारांच्या मृत्यूमुळे निवडणुका घेण्यात आल्या नव्हत्या आता त्या निवडणुका येणाऱ्या दिवसात घेण्यात येणार आहे.

Team Global News Marathi: