सोने-चांदीच्या दरात वाढ; जाणून घ्या आजचे भाव

नवी दिल्ली : सोमवारी राष्ट्रीय राजधानीत सोन्या-चांदीच्या स्पॉट किंमतींमध्ये वाढ नोंदविण्यात आली. एचडीएफसी सिक्युरिटीजच्या म्हणण्यानुसार आठवड्याच्या पहिल्या व्यापार सत्रात सोन्याच्या दरात प्रति 10 ग्रॅम 179 रुपयांची वाढ झाली. यामुळे शहरातील सोन्याचे भाव प्रति 10 ग्रॅम 47,452 रुपयांवर पोचले.

मागील सत्रात 10 ग्रॅम सोन्याचा दर 47,273 रुपये होता. त्याचप्रमाणे शहरातील चांदीच्या किंमतीत प्रति किलो किलोमागे 826 रुपयांची वाढ झाली. यामुळे शहरातील चांदीचा दर प्रति किलो 71,541 रुपये झाला. मागील सत्रात चांदीचा दर प्रति किलो 70,715 रुपये होता.

आंतरराष्ट्रीय पातळीवर सोन्याच्या किमती प्रति औंस 836 डॉलर होते. त्याचप्रमाणे चांदीची किंमत औंस 27.65 डॉलर होती.

ग्लोबल मार्केटमध्ये सोन्याची किंमत

एचडीएफसी सिक्युरिटीजचे वरिष्ठ विश्लेषक (कमोडिटीज) तपन पटेल म्हणाले की, डॉलरच्या किंमतीतील वाढ आणि अमेरिकन बाँडच्या उत्पन्नात घट यामुळे सोन्याच्या किंमती वाढल्या.

फ्युचर्स मार्केटमध्ये सोन्याचा भाव (Gold Price Today in Futures Market)

मल्टी कमोडिटी एक्सचेंजमध्ये संध्याकाळी 05:31 वाजता जून 2021 च्या डिलीव्हरी सोन्याचा दर 305 रुपये म्हणजे 0.64 टक्क्यांच्या वाढीसह प्रति 10 ग्रॅम 48,056 रुपयांवर होता. त्याचप्रमाणे ऑगस्ट कॉन्ट्रॅक्ट सोन्याचे दर 337 रुपये म्हणजे 0.70 टक्क्यांनी वाढून 48,470 रुपये प्रति 10 ग्रॅम होते.

फ्युचर्स मार्केटमध्ये चांदीची किंमत (Silver Price Today in Futures Market)

एमसीएक्सवर जुलैमध्ये डिलीव्हरी करण्यात येणाऱ्या चांदीचा भाव 1036 रुपयांच्या म्हणजेच 1.45 टक्क्यांनी वाढून 72,465 रुपये प्रतिकिलो राहिला. त्याचबरोबर सप्टेंबरमध्ये चांदीचा भाव 1,196 रुपयांच्या म्हणजेच 1.65 टक्क्यांनी वाढून 73,600 रुपये प्रतिकिलो राहिला.

ग्लोबल न्युज नेटवर्क: