राज्याची चिंता वाढविणारी बातमी, दक्षिण आफ्रिकेवरून आलेले 6 जण कोरोना पॉझिटिव्ह!

मुंबई : दक्षिण आफ्रिकेत (South Africa) कोरोनाचा ओमिक्रॉन हा नवा व्हेरिएंट (Omicron variant of Coronavirus) आढळून आला आहे. राज्यात दक्षिण आफ्रिकेवरून आलेल्या प्रवाशांची माहिती एकत्र करण्याचे काम सुरू आहे.  या प्रक्रियेत आतापर्यंत आलेल्या प्रवाशांपैकी 6 जण कोविड पॉझिटिव्ह आढळले आहे. मुंबई एक तर पुण्यात 2 जणांचा समावेश आहे. पण एक चांगली गोष्ट म्हणजे यांच्यात नव्या व्हेरिएंट नसल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे.

दक्षिण आफ्रिकेवरून आलेल्या प्रवाशांपैकी ६ जण हे कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहे. यामध्ये मुंबई महापालिका, कल्याण डोंबिवली महापालिका, मीरा भाईंदर महापालिका आणि पुण्यात एक-एक रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहे. तर पिंपरी चिंचवडमध्ये 2 नायजेरियन  नागरिक कोरोना पॉझिटिव्ह सापडले आहेत, राज्य सरकारच्या आरोग्य विभागाने ही माहिती दिली आहे.

जगभरातील १९ देशात कोरोनाचा नवीन घातक व्हेरिएंट आढळून आल्यामुळे खळबळ उडाली आहे. राज्य सरकारने कोरोनाची नवीन नियमावली जाहीर केली आहे. १ डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या शाळा उघडण्याचा निर्णय लांबणीवर टाकला असून आता शाळा १५ डिसेंबरला सुरू होणार असल्याचे शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले आहे. राज्यातील प्रमुख शहरात हा निर्णय घेण्यात आला आहे.   दक्षिण आफ्रिकेतून प्रवासी भारतात दाखल होत आहे. त्यातील ६ रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह झाल्यामुळे चिंता वाढली आहे.

दरम्यान, डोंबिवलीतील (dombivali) एक तरुण दक्षिण आफ्रिकेवरून आला असून कोरोना पॉझिटिव्ह आढळला आहे. पण, हा तरुण दक्षिण आफ्रिकेवरून आलेला एकमेव प्रवासी नसून 10 नोव्हेंबरपासून 1000 प्रवाशी मुंबईत आल्याची माहिती राज्याचे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे (aditya thackery) यांनी दिली. तसेच राज्य सरकार अशा प्रवाशांचा शोध घेऊन त्याचे स्कॅनिंग करण्याचे काम करीत आहे.

‘राज्यात पर्यटनासाठी कोणी कुणाला अडवत नाही. पण काळजी घेणं गरजेचं आहे. गेल्या 10 नोव्हेंबरपासून दक्षिण अफ्रिकेतून १ हजारांच्या आसपास प्रवासी आले आहे. या सर्व प्रवाशांना ट्रेस केले जात आहे. ते मुंबईत आहेत त्यांची माहिती घेतली जात आहे’, अशी माहिती आदित्य ठाकरे यांनी दिली.

ग्लोबल न्युज नेटवर्क: