राज्याचे विरोध पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची केंद्रीय मंत्रिमंडळात लागू शकते वर्णी ?

 

नवी दिल्ली | कोरोना संसर्गामुळे संपूर्ण देशावर संसर्गावर मोठं संकट आलं होतं. त्यामुळे राज्य सरकार कोरोना परिस्थिती नियंत्रणात आणण्याच्या प्रयत्नात होते. त्यामुळे केंद्राच्या दुसऱ्या कार्यकाळात मंत्रीमंडळाचा विस्तार करण्यात आला नव्हता. आता कोरोना परिस्थिती सुधारत असल्यानं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा बहुप्रतीक्षित मंत्रिमंडळाचा विस्तार पुढच्या आठवड्यात होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

मोदी सरकारच्या या मंत्रीमंडळाच्या विस्तारात महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे. त्याच्या नावाची सध्या चर्चा सध्या दिल्लीत सुरू आहे. देवेंद्र फडणवीस यांच्यासह माजी माजी महिला व बालकल्याणमंत्री पंकजा मुंडे यांनाही केंद्रातील मंत्रीमंडळात स्थान दिलं जाऊ शकतं. महाराष्ट्रातील या दोन नेत्यांची वर्णी केंद्रात लागू शकते.

देवेंद्र फडणवीस यांनी २९ जूनला दिल्ली दौरा केला होता. त्यात त्यांनी अनेक वरिष्ठ नेत्यांच्या भेटीगाठी घेतल्या होत्या. केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांची त्यांनी सदिच्छा भेट घेतली होती. त्यानंतरच त्यांना केंद्रात बोलवण्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. तर मागील काही दिवसांपासून ते केंद्रातील कामाचं देखील कौतूक करताना दिसत आहेत. मात्र अद्यापही याबाबत सविस्तर वृत्त समोर आलेले नाही.

Team Global News Marathi: