राज्यात वाढत असलेल्या कोरोना रुग्णसंख्याच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी करणार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा

राज्यात पुन्हा एकदा कोरोनाने आपलं डोकं वर काढलं आहे. आज वाढत असलेली रुग्णसंख्या राज्य तसेच केंद्र सरकारच्या अडचणी वाढवताना दिसत आहे. त्यामुळे याच पार्श्वभूमीवर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी राज्यात वाढत असलेल्या रुग्णसंख्या संदर्भात सविस्तर चर्चा करणार असल्याची माहिती खात्रीदायक सूत्राच्या माद्यमातून समोर येत आहे.

राज्यात तब्बल काल १५,०५१ नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. हा आकडा रविवारच्या तुलनेत थोडा कमी झाला असला तरी देशातील सर्वाधिक प्रकरणे आता महाराष्ट्र राज्यात आढळत आहेत. देशातील सर्वात जास्त ऍक्टिव्ह केसेस असलेले सर्वात जास्त जिल्हे महाराष्ट्रातच असल्यामुळे राज्यातील कोरोनाला नियंत्रित करण्याचे मोठ आव्हान सरकारसमोर आहे.

संपूर्ण दिवसभरातील एकूण १५,०५१ नव्या प्रकरणांपैकी १७१३ प्रकरणे मुंबईत आहेत. पुण्यात ११२२ कोरोन रुग्णांची नोंद झाली आहे. मुंबईतील आकडा वाढताच आहे, तर पुण्यातील केसेस आज कमी झाले आहेत. तर नागपूरने मात्र मुंबई, पुण्यालाही मागे टाकत २०९४ केसेस नोंदवल्या गेल्या आहेत.

महाराष्ट्रातील कोरोनाचा वाढता प्रकोप पाहता पंतप्रधान नरेंद्र मोदींचेही टेन्शन वाढले आहे. कोरोनाचा धोका आणि कोरोना लशीबाबत ते आता थेट मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार आहेत. मोदी मुख्यमंत्र्यांसोबत व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे बैठक करणार आहेत. १७ मार्च दुपारी १२ वाजता मुख्यमंत्र्यांसोबत बोलणार आहेत.

Team Global News Marathi: