कधी कधी आपण फारच विचार करतो…..

कधी कधी आपण फारच विचार करतो…..
विश्वास तांबे

होतं ना अस कधी कधी? मग ठीक आहे. पण नेहमीच अस होत असेल तर प्रोब्लेम आहे. आज अचानक हा विचार मनात आला. माझं एखाद गुपित (मुळात ते गुपित आहे की नाही याची व्याख्या करावी लागेल) बाहेर येईल की काय? याला कळाले, त्याला कळाले तर काय? किती ती काळजी? किती ती भीती? आणि उगाचच ची लपवाछपवी.

मनाचाच की खेळ तो की, ‘ माझी ही गोष्ट याला समजली तर तो माझे नुकसान करेल, माझ्यावर हसेल’ पण खरंच त्याला तेवढा वेळ, इंटरेस्ट आहे का तुमच्या प्रश्नात ( गुपितात) ? कदाचित तो/ती तुम्हाला तेवढी value ही देत नसेल. किंवा value देत असेल तर तुमच्या गुपिताचा स्वीकार करेल, तुम्हाला मदत करेल.

आपली गुपित पण लई भरी असतात. मी काही शिकतोय हे कोणाला सांगायचे नाही. अ रे पण जे शिक्षण तुला प्रगल्भते कडे नेणार आहे. तिथे हा दृष्टिकोन किती वाईट.

मी आजारी आहे. उपचार घ्यायला गेलो तर लोकांना समजेल. अ रे पण उपचार घेतले नाही तर राहशील का? आणि गेलास तर समजेलच की लोकांना.

मोठं घर बांधलाय पण आता पैसा नाही. मग सांग लोकांना की केली उधळपट्टी आता बसलोय ठणठण करत. कुठं विघडल? चूक केली तर कर मान्य. कशाला अजुन पण खोटी जहागीर दारी दाखवायची?

एकदा स्वतःला योग्य ठिकाणी उलगडून ठेवायला शिकल की इतरांपेक्षा जास्त हलक वाटायला लागत. हलक झालं की भरारी घेता येते, उंच आकाशात….

ग्लोबल न्युज नेटवर्क: