सोलापूर विद्यापीठाच्या परीक्षा पुढे ढकलल्या ; वाचा नवीन वेळापत्रक

पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या परीक्षा पुढे ढकलल्या

परीक्षा नियंत्रक श्रेणीक शहा यांनी काढली परिपत्रक

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या ऑनलाइन, ऑफलाइन परीक्षा घेताना व्हायरस अटॅकमुळे सर्व्हर क्रॅश झाल्याच्या कारणामुळे आज दि. 6 ऑक्टोबर रोजी ऑफलाईन परीक्षा झालेली आहे. सर्व अभ्यासक्रमाच्या परीक्षा 21 ऑक्टोबर रोजी घेण्यात येईल. 7 ते 8 ऑक्टोंबर रोजीच्या सर्व ऑनलाईन, ऑफलाईन परीक्षा 22 व 23 ऑक्टोंबर रोजी पूर्वनियोजित वेळेत होणार असल्याची माहिती प्रभारी परीक्षा संचालक श्रेणिक शहा यांनी पत्रकान्वये दिली आहे.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या एटीकटी, बॅक लॉक च्या परीक्षा सोमवारपासून सुरू झाले आहेत. मात्र पहिल्या दिवशी सर्वर डाऊन व तांत्रिक समस्या आल्यामुळे विद्यार्थी संतापले होते. दरम्यान आज मंगळवारी होणारी ऑनलाईन परीक्षा झालीच नाही. विद्यार्थी दिवसभर विद्यापीठाच्या परीक्षेच्या लॉगिन वर लॉग इन करत राहिले मात्र सुरू झालेच नाही. सर्वर डाऊन, वायरस अटॅकमुळे या परीक्षा पुढे ढकलण्यात आले आहेत. विद्यार्थीसह , पालक, सामाजिक संघटना यांच्या मागण्या मुळे विद्यापीठाने परीक्षा पुढे ढकलल्या आहेत.

येत्या 9 ऑक्टोबर पासून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या ऑनलाइन ऑफलाइन पद्धतीच्या परीक्षापूर्व वेळेप्रमाणे होणार आहे.

व्यवसायिक अभ्यासक्रमाच्या परीक्षेची वेळ बदलली

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या इंजिनीअरिंग ,फार्मसी, आर्किटेक्चर या व्यवसायिक अभ्यासक्रमाच्या वेळा बदलण्यात आल्या असून 11:30 ते 4: 30 ऐवजी 3 ते 9 वाजेपर्यंत परीक्षा होईल. पारंपरिक अभ्यास करण्याच्या वेळी कोणताही बदल नाही. याची नोंद शिक्षक-विद्यार्थी यांनी घ्यावी असे आवाहन परीक्षा संचालक शहा यांनी केले आहे.

ग्लोबल न्युज नेटवर्क: