सोलापूर : खर्चासाठी नाहीत पैसे! एसटी संपातील कर्मचाऱ्याच्या 20 वर्षीय मुलाची आत्महत्या

सोलापूर : खर्चासाठी नाहीत पैसे! एसटी संपातील कर्मचाऱ्याच्या 20 वर्षीय मुलाची आत्महत्या

सोलापूर : एसटी महामंडळात (ST Corporation) 22 वर्षांपासून चालक असलेल्या तुकाराम माळी (Driver Tukaram Mali) हे संपात सहभागी असल्याने मागील दोन महिन्यांपासून त्यांचा पगार (Salary) बंद आहे. मात्र, घर चालविणे आणि मुलांच्या शिक्षण (Education) आदी खर्च भागविणे शक्‍य झाले नाही. हीच चुणचुण माळी यांच्या मुलाच्या मनात सलत होती आणि बुधवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास अमर तुकाराम माळी (Amar Mali) (वय 20) (रा. राहुटी, कोंडी) याने राहत्या घरी आत्महत्या (Suicide) केल्याचा प्रकार उघडकीस आला.

अमरचा मृतदेह दुपारी चार वाजेच्या सुमारास सिव्हिलमध्ये आणण्यात आला. यावेळी कुटुंबियासह इतरांना अश्रूंचा बांध फुटला. आगारातील कर्मचारी भेटण्यास आल्याने बसस्थानकात उभ्या असलेल्या लालपरीचा कंठही दाटून आला होता. सोलापूर (Solapur) आगारात तुकाराम माळी हे 2000 मध्ये एसटी महामंडळात चालक म्हणून रुजू झाले होते. अल्प वेतनावर ते कार्यरत होते. त्यांना दोन मुले पत्नी आणि आई यासह भाऊ असा परिवार आहे. त्यांची दोन्ही मुले विज्ञान शाखेत शिक्षण (Education) घेत आहेत. एसटी महामंडळाचे राज्य शासनात विलगीकरण करण्याच्या मागणीसाठी सोलापूर विभागात (Solapur Division) (ता. 27) ऑक्‍टोबरपासून संप सुरू आहे.

या संपात तुकाराम माळी हे ही सुरुवातीपासून सहभागी होते. काही दिवसांपूर्वीच शासनाने वेतनवाढीसह काही मागण्यांना हिरवा कंदील दाखविला. परंतु कर्मचारी विलगीकरणाच्या मुद्यावर ठाम आहेत. त्यामुळे संप सुरूच होता. बुधवारी नेहमीप्रमाणे माळी हे बसस्थानक आंदोलनस्थळी आले. या ठिकाणी त्यांना आपल्या मुलाच्या आत्महत्येची माहिती मिळाली. विशेष म्हणजे यापूर्वी सोलापूर विभागातील तीनशेहून अधिक जणांचे निलंबन करण्यात आले. त्यामुळे काहीसे तणावातच असलेले माळी हे उसनावारी पैसे घेवून प्रपंच चालवित होते. मात्र, माळी यांनी आपल्या मुलाला पाहताच त्यांना अश्रू अनावर झाले. आपल्या सहकाऱ्यांच्या मुलाच्या आत्महत्येची ही वार्ता इतर संपकरी कर्मचाऱ्यांना समजल्यानंतर तेही आक्रमक झाले. नातेवाइकांनी रुग्णालयातच हंबरडा फोडला. त्यानंतर माळी यांच्या नातेवाइकांशी संपकरी कर्मचाऱ्यांनी कोंडी येथे जावून माळी यांचे सांत्वन केले.

मयत माळी यांचे वडील, आई ही कोंडी येथे राहतात. मुलाच्या निधनाची बातमी कळताच त्यांना नातेवाइकांनी बसस्थानकात बोलावण्यास आले. यावेळी वडील तुकाराम आणि आई यांनी माझा लेक मला परत द्या, असा आक्रोश केला. तर मोठा भाऊ याने हंबरडा फोडला. त्यामुळे उपस्थितांचे मन हळहळले.

 

ग्लोबल न्युज नेटवर्क: