धक्कदायक | दिल्ली विधानसभेत आढळले गुप्त भूयार!

 

नवी दिल्ली | राजधानी नवी दिल्ली नेहमी विविध विषयांसाठी चर्चेत असते. आता नवी दिल्ली चर्चेत आली आहे, ते एक भूयार सापडल्याने एकाच खळबळ उडाली आहे. दिल्ली विधानसभेत चक्क एक गुप्त भूयार सापडले आहे. दिल्ली विधानसभेत गुरुवारी भूयारासारखी रचना गुरुवारी आढळली. त्याची सध्या सर्वत्र चर्चा आहे. इंग्रजाच्या राजवटीत या भूयाराचा वापर होत असल्याची माहिती मिळाली आहे.

दिल्ली विधानसभा अध्यक्ष राम निवास गोयल यांनी याबाबतची माहिती दिली. दिल्ली विधानसभेत असलेले हे गुप्त भूयार थेट लाल किल्ल्यापर्यंत जाते. इंग्रजाच्या राजवटीत स्वातंत्र्यसेनानींना आणण्यासाठी ब्रिटीश सरकारकडून या भूयाराचा वापर करण्यात येत होता. त्यामुळे या स्वातंत्र्यसेनानींना कुठे नेण्यात येत आहे. याची माहिती जनतेला मिळत नव्हती.

पुढे गोयल म्हणाले की, आपण १९९३ मध्ये आमदार झाल्यावर दिल्ली विधानसभेमध्ये गुप्त भूयार असून ते लाल किल्ल्यापर्यंत जात असल्याचे सांगण्यात येत होते. आपण त्याबाबतचा इतिहास शोधण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याबाबत कोणतीही ठोस माहिती हाती आली नाही. आता आम्हांला या भूयाराचे उगम स्थान सापडले असून पुढे खोदकाम करण्यात येत नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

मेट्रोच्या अनेक योजना आणि सिवरच्या कामामुळे भूयाराचे रस्ते नष्ट झाले आहेत. त्यामुळे पुढे खोदकाम करता येत नसल्याचे त्यांनी सांगितले. देशाची राजधानी १९१२ मध्ये कोलकाताहून दिल्लीला स्थानांतरीत केल्यावर सध्या दिल्ली विधानसभा असलेल्या ठिकाणी केंद्रीय विधानसभेचे कामकाज चालत होते, अशी माहिती गोयल यांनी दिली.

Team Global News Marathi: