शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात, सेन्सेक्स २५० अंकांनी वधारला

 

विक्रीचा सपाटा सुरू असलेल्या शेअर बाजारात आज खरेदीचा जोर दिसून येत आहे. शेअर बाजाराची सुरुवात तेजीसह झाली. बाजार सुरू झाला तेव्हा सेन्सेक्स निर्देशांक 250 अंकांनी वधारला. तर, निफ्टी निर्देशांक 17650 अंकांवर व्यवहार करत होता.

सलगच्या तीन दिवसाच्या पडझडीनंतर अमेरिकन शेअर बाजारात चांगली तेजी दिसून आली. त्याशिवाय, युरोपियन बाजारातही तेजी दिसून आली.तसेच आशियाई बाजारपेठातही तेजी कायम आहे. त्याचा परिणाम भारतीय शेअर बाजारावर दिसून आला.शेअर बाजारातील व्यवहार सुरू झाले तेव्हा सेन्सेक्स 250.88 अंकांनी वधारत 59338.31 अंकांवर खुला झाला.

तर, निफ्टी 69.90 अंकांनी वधारत 17674.90 अंकांवर खुला झाला. सकाळी 9.40 वाजण्याच्या सुमारास सेन्सेक्स 303 अंकांच्या तेजीसह 59,389.15 अंकांवर व्यवहार करत होता. तर, निफ्टी 99 अंकांनी वधारत 17,704.60 अंकावर व्यवहार करत होता.

Team Global News Marathi: