शेअर बाजारात आज घसरणीची शक्यता; कोणत्या फॅक्टरवर होऊ शकतो परिणाम?

 

शेअर बाजार गेल्या आठवड्यापासून दबावाखाली आहे. 60 हजारांचा टप्पा ओलांडल्यानंतर गुंतवणूकदारांचे सेंटिमेंट्स निगेटिव्ह झोनमध्ये गेले असून, त्यावर जागतिक बाजाराचा दबावही स्पष्टपणे दिसून येत आहे. शेवटच्या ट्रेडिंग सत्रात सेन्सेक्स 59 अंकांनी घसरून 58,834 वर बंद झाला होता, तर निफ्टी 36 अंकांच्या घसरणीसह 17,559 वर पोहोचला होता.

गेल्या सत्रात जागतिक बाजारात मोठी घसरण झाली होती, त्यामुळे आज देशांतर्गत गुंतवणूकदारांच्या भावनांवरही परिणाम होईल, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. आशियाई आणि अमेरिकन बाजारातील घसरणीमुळे आज गुंतवणूकदार दबावाखाली असतील आणि आज प्रॉफिट बुकिंग सुरुवातीपासूनच बाजारावर वर्चस्व गाजवेल अशी अपेक्षा आहे.

यूएस आणि युरोपियन बाजार अमेरिकन केंद्रीय बँक फेडरल रिझर्व्हचे प्रमुख जेरोम पॉवेल यांनी महागाई नियंत्रणात येईपर्यंत व्याजदर वाढवण्याचे संकेत दिले आहेत.किरकोळ महागाई दर 2 टक्क्यांपर्यंत आणण्यासाठी व्याजदरात सातत्याने वाढ करण्यात येईल, असे त्यांनी स्पष्टपणे सांगितले. त्याचा परिणाम तेथील शेअर बाजारांवरही दिसून आला आणि शेवटच्या व्यवहारात मोठी घसरण झाली. अमेरिकेतील प्रमुख शेअर बाजार DOW JONES ने मागील सत्रात 3.03% ची घसरण नोंदवली, तर S&P 500 3.37% घसरून बंद झाला आणि NASDAQ वर 3.94% घसरला.

Team Global News Marathi: