सर्व सामान्य नगरिकांना झटका, १८ जुलैपासून ‘या’ वस्तूंसाठी मोजावे लागणार जास्त पैसे

 

नवी दिल्ली : देशभरात कोरोनानंतर महागाईच्या झळा सर्वसामान्यांना बसत आहेत. त्यातच आता आणखी एक धक्का सर्वसामान्यांना बसणार असल्याचे दिसत आहे. येत्या 18 जुलै 2022 पासून महागाईचा मोठा धक्का बसणार आहे. 28-29 जून रोजी झालेल्या GST कौन्सिलच्या बैठकीत घेतलेल्या निर्णयांची अंमलबजावणी 18 जुलैपासून होणार आहे. य निर्णयामुळे महागाई आणखी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

जीएसटी कौन्सिलने सर्वसामान्यांच्या वापरात येणाऱ्या अनेक वस्तूंवरील कर दर वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच अनेक वस्तूंसाठी उपलब्ध जीएसटी सूट काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे. तर काही वस्तू अशा आहे ज्यांवर जीएसटीचे दर वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. डब्यात किंवा पॅक केलेले आणि लेबल केलेले (फ्रोझन वगळता) मासे, दही, पनीर, लस्सी, मध, सुका मखना, कोरडे सोयाबीन, मटार, गहू आणि इतर तृणधान्ये आणि तांदूळ यांसारख्या उत्पादनांवर आता 5% जीएसटी लागू होणार आहेत. आत्तापर्यंत या वस्तूंना जीएसटीमधून सूट देण्यात आली होती. बँकेकडून टेट्रा पॅक आणि चेक जारी करण्याच्या सेवेवर 18 टक्के जीएसटी भरावा लागेल. अॅटलससह नकाशे आणि तक्त्यांवर 12 टक्के जीएसटी लावण्याचा निर्णय लागू होणार आहे. हे सर्व दार येत्या १८ तारखेपासून लागू करण्यात येणार आहेत.

मुलांच्या शिक्षणाशी संबंधित गोष्टी आता महाग होणार आहेत. जीएसटी कौन्सिलने प्रिंटिंग-ड्रॉइंग शाई, पेन्सिल शार्पनर, एलईडी दिवा, ड्रॉइंग आणि मार्किंग उत्पादने चाकू, पेपर-कटिंग नाइफ यावरील जीएसटी दर वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. या वस्तूंवर 18 टक्के जीएसटी भरावा लागेल. सोलर वॉटर हीटर्सवर आता 12 टक्के जीएसटी लागणार आहे. जो पूर्वी 5 टक्के जीएसटी होता. एलईडी दिवे, दिवे यांनाही आता 12 ऐवजी 18 टक्के जीएसटी लागणार आहे.

 

Team Global News Marathi: