दलित अत्याचाराविरुद्ध कधीही आवाज न उठविणाऱ्या संजय राऊत यांनी आम्हाला शिकवू नये – आठवलें

दलित अत्याचाराविरुद्ध कधीही आवाज न उठविणाऱ्या संजय राऊत यांनी आम्हाला शिकवू नये – आठवलें

शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत यांनी आजपर्यन्त कधीही दलित अत्याचाराविरुद्ध ब्र शब्द काढला नाही. दलित अत्याचारविरुद्ध कधी ते पुढे आले नाहीत. दलित अत्याचार जिथे होईल तेथे मी पोहोचलेलो आहे. दलित अत्याचराविरुद्ध सतत लढत राहिलो आहे. दलित पँथर च्या चळवळीतून मी पुढे आलो आहे. त्यामुळे दलित अत्याचारांच्या प्रश्नांवर नेहमी मूग गिळून बसणाऱ्या खासदार संजय राऊत यांनी आम्हाला दलित अत्याचाराविरुद्ध लढण्याचे शिकवू नये असा जबरदस्त टोला रामदास आठवले यांनी संजय राऊत यांना प्रतिउत्तर दिले आहे.

संजय राऊत यांनी आठवलेंवर टीका करताना हाथरस प्रकरण घडत असताना आठवले हे नटींच्या घोळक्यात होते असा आरोप केला होता त्याला उत्तर देताना आठवले यांनी म्हंटले आहे की संजय राऊत हे नटींच्या घोळक्यात असतात की नाही ते माहीत नाही.मी नटींच्या घोळक्यात नसती मी मात्र नेहमी कार्यकर्त्यांच्या घोळक्यात असतो. दलित अत्याचाराविरुद्ध मी मूळ पँथर असल्याचे आठवले यांनी म्हंटले आहे.

विचारांच्या उंचीला कृतीचं बळ मिळण्याकरिता लागते ती दुर्दम्य इच्छाशक्ती !

हाथरसची घटना घडली त्यादिवशी मुंबईत राज्यपालांची पूर्वनियोजित भेट ठरली होती. ती भेट झाल्यानंतर आम्हाला हाथरस च्या घटनेची माहिती मिळाताच त्या अमानुष घटनेचा आम्ही तीव्र निषेध केला.आंदोलन केले.लखनौला जाऊन उत्तर प्रदेशच्या राज्यपालांना भेटलो. हाथरसला भेट देण्यास जाताना तेथिल जिल्हा प्रशासनाने सर्वच पक्षाच्या नेत्यांना भेट देण्यापासून अडविले होते. त्यामुळे मी हाथरस जाऊ शकलो नाही आता मात्र उद्याच हाथरसला जाऊन पीडित दलित मुलीच्या कुटुंबियांची भेट घेणार आहे. त्यांना संरक्षण मिळवून देणार अहे असा खुलासा रामदास आठवले यांनी केला.

जाणून घ्या महाराष्ट्रातील घराघरात केलं जाणारं पिठलं…अनं त्याची खासियत

ग्लोबल न्युज नेटवर्क: