राज ठाकरें यांचा अयोध्या दौरा, संजय राऊत यांचे सूचक वक्तव्य

राज ठाकरें यांचा अयोध्या दौरा, संजय राऊत यांचे सूचक वक्तव्य

राज ठाकरे येत्या १ ते ९ मार्च दरम्यान अयोध्या दौऱ्यावर जाणार आहेत. अशी माहिती मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी दिलेली आहे. राज ठाकरेंच्या या दौऱ्याबाबत शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांना विचारण्यात आले असता त्यांनी सूचक वक्तव्य केले आहे.

यावर बोलताना राऊत म्हणाले की, राज ठाकरे अयोध्या दौऱ्यावर जात असतील तर चांगलीच गोष्ट आहे. प्रभू राम हा काही राजकारणाचा विषय नाही. आम्ही अनेकदा अयोध्येला जाऊन आलो आहोत. त्यांनाही जावसं वाटत असेल तर त्यांनी नक्की जावं. आम्ही त्यांना मार्गदर्शन करू”, असं संजय राऊत म्हणाले. ते एका प्रसिद्ध मराठी वृत्तवाहिनीशी बोलत होते.

मनसेची मुंबईत वांद्रे येथील एमआयजी क्लबमध्ये पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. या बैठकीत राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्यावर शिक्कामोर्तब करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, याआधी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे देखील अयोध्या दौऱ्यावर गेले होते. त्यांनी रामलल्लाचं दर्शन घेऊन शरयू नदीच्या काठावर महाआरती देखील केली होती.

ग्लोबल न्युज नेटवर्क: