रशियाने सोशल मिडीयावरील अनेक अॅप्सवर घातली बंदी

रशिया आणि युक्रेनमध्ये सुरु असलेल्या युद्धामुळे सर्मपूर्ण जगभर परिस्थिती बिघडली आहे अशातच रशियाने फेसबुक आणि ट्विटर या सोशल मीडिया साइटवर कारवाई करायला सुरूवात केली आहे. रशियन संसदेने फेक न्यूजबाबत कठोर कायदा जाहीर केला होता. युद्धादरम्यान रशियन सैन्याविरोधात फेक न्यूज पसरवल्या जात असल्याचा आरोप संसदेने केला आहे. फेसबुकवर रशियन मीडियाशी भेदभाव केल्याचा आरोप केला आहे. द कीव इंडिपेंडंटच्या रिपोर्टनुसार, रशियन सरकारच्या सेन्सॉरशिप एजन्सीने फेसबुकवर बंदी घालण्याची घोषणा केली आहे.

फेसबुकने रशियावर लाखो लोकांना विश्वासार्ह माहिती पोहचवण्यापासून रोखल्याचा आरोप केला आहे. फेसबुकवर बंदी घातल्यानंतर रशियाने ट्विटरवरही कारवाई केली आहे. रशियामध्ये ट्विटरवर बंदी घालण्यात आली आहे. यासाठी एका विधेयकावर स्वाक्षरी करण्यात आली असून या कायद्यानुसार देशाच्या सशस्त्र दलांबद्दल ‘खोटी’ माहिती पसरवणाऱ्या व्यक्तीला 15 वर्षांपर्यंत तुरुंगवास होऊ शकतो.

बीबीसी, यूएस सरकार-अनुदानित व्हॉइस ऑफ अमेरिका आणि रेडिओ फ्री युरोप/रेडिओ लिबर्टी, जर्मन प्रसारक डॉयचे वेले आणि लातविया स्थित वेबसाइट मेडुझा यांवर देखील बंदी घालण्यात आली आहे. सोशल मीडिया रशियाविरोधात, रश्यन भाषेत बातम्या देणाऱ्या विदेशी आउटलेटवर मोठ्या प्रमाणावर कारवाई करण्यात आली. रशियाने या प्रसार माध्यमांवर देशांतर्गत प्रेक्षकांना युक्रेनवरील आक्रमणाबद्दल चुकीची माहिती दिल्याचा आरोप सातत्याने केला आहे.

Team Global News Marathi: