बार्शी तालुक्यातील कळंबवाडीतील सेवानिवृत्त शिक्षकाचा भरदिवसा रस्त्यावर खून

बार्शी: बार्शी तालुक्यातील आगळगाव ते उम्बर्गे या रोडवर गुरुवार दिनांक 22 ऑक्टोबर रोजी भर दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास कळंबवाडी (आ) याठिकाणचे रहिवासी असलेले सेवानिवृत्त शिक्षक त्र्यंबक उमाप यांचा दगडाने ठेचून खून करण्यात आला आहे. हा खून केल्यानंतर आरोपी स्वतःहून पोलीस ठाणे येथे हजर झाले आहेत. आरोपीविरुद्धबार्शी तालुका पोलीस स्टेशनला खुनाचा गुन्हा दाखल झाला आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी, की सदर गुन्ह्याचे फिर्याद सेवानिवृत्त शिक्षक त्रिंबक उमाप यांचे चिरंजीव गणेश त्रिंबक उमाप यांनी बार्शी तालुका पोलीस ठाणे या ठिकाणी दाखल केली असून फिर्यादीत म्हटल्याप्रमाणे, सदर गुन्ह्यात मयत त्र्यंबक उमाप हे आपल्या शेतातील उडीद पिकाची पट्टी घेण्यासाठी बार्शी बाजार समिती या ठिकाणी जात असताना आगळगाव ते उम्बर्गे या रस्त्यावर ती मधेच आरोपी बिभीषण विश्वनाथ उमाप व त्याचे वडील विश्वनाथ बाबू उमाप या दोघा बाप-लेकांनी त्यांची गाडी अडवून त्यांच्याशी जोरदार भांडण केले.

या दोघांचे जोराचे भांडण चालू असल्याचे फिर्यादीचे चुलत भाऊ सुमंत उमाप यांनी फिर्यादीस फोन वरून सांगितले असता ते तात्काळ दुसरी दुचाकी घेऊन गुन्हा झालेल्या ठिकाणी पोहोचले असता त्यांना त्यांचे वडील त्रिंबक उमाप हे रक्ताच्या थारोळ्यात पडलेले दिसले तसेच वरून दोघेही आरोपी लाथाबुक्क्यांनी दगडाने त्यांना मारत आहेत, असे दिसले.

फिर्यादीचे वडील रक्ताच्या थारोळ्या खाली पडलेले दिसले तसेच मयत यांच्या अंगावर बिभीषण विश्वनाथ उमाप बसलेला दिसला , त्यावेळी त्याच्या अंगावर रक्ताने माखलेला भगवा शर्ट व गळ्यात पांढरा गमज्या होता. तसेच त्याचे वडील विश्वनाथ बाबु उमाप हे पायावर बसलेले होते . त्यावेळी तेथे इतर लोक जमा झालेले पाहुन ते दोघे तेथुन पळुन गेले . तेथे जमा झालेल्या लोकांपैकी फिर्यादीच्या ओळखीचे मोहन पकाले , शकर माणिकराव पाटील व नागनाथ गुरुजी यांनी फिर्यादिस सांगितले की , तुझ्या वडिलांना बिभीषण विश्वनाथ उमाप त्याचे वडील विश्वनाथ बाबु उमाप यांनी आडवुन दगडाने व लाथा बुक्याने मारले. तसेच तुझे वडील आम्हाला वाचवा वाचवा असे म्हणत होते परंतु विभीषण विश्वनाथ उमाप व विश्वनाथ बाबु उमाप यानी आम्हालाही , तुम्ही पुढे सोडवायला आला तर तुमचीही विकेट उडेल , अशी धमकी देवुन आमच्या दिशेने जोरात दगडे मारू लागले . त्यामुळे आम्ही त्यांच्या जवळ जावु शकलो नाही, असे सांगितले.

त्या नंतर फिर्यादीने नागनाथ गटकळ गुरूजी , शंकर पाटील यांच्या मदतीने जखमी वडिलांना ग्रामीण रुग्णालय बार्शी येथे उपचाराकरिता दाखल केले . परंतु डॉक्टरांनी मयत झाल्याचे घोषित केले. सदर घटनेनंतर आरोपी मुलगा व वडील दोघेही बार्शी पोलीस स्टेशन या ठिकाणी हजर झाले असून त्यांच्यावर ती भारतीय दंड विधान 302 प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे. दोघेही आरोपी अटकेत आहे. याचा तपास बार्शी तालुका पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी जायपत्रे हे करत आहेत.

ग्लोबल न्युज नेटवर्क: