एअर इंडियाच्या हस्तांतरणानंतर रतन टाटांची खास इन्स्टा पोस्ट! वाचा सविस्तर

एअर इंडियाच्या हस्तांतरणानंतर रतन टाटांची खास इन्स्टा पोस्ट!वाचा सविस्तर

मुंबई : भारताची सरकारी विमान कंपनी एअर इंडिया आता टाटांच्या मालकीची झाली आहे. मूळची टाटांचीच असलेली ही कंपनी सुमारे ६९ वर्षानंतर पुन्हा टाटांच्या ताब्यात आली आहे. त्यामुळं टाटा सन्स आणि टाटा ग्रुपचे माजी अध्यक्ष रतन टाटा यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट टाकून आनंद व्यक्त केला आहे.

रतन टाटा यांनी आपल्या इन्स्टाग्रामवर स्टेटस स्वरुपात एअर इंडियाचं हवेत उड्डाण केलेल्या विमानाचा फोटो पोस्ट केला आहे. तसेच त्यावर ‘वेलकम बॅक एअर इंडिया’ असं क्रिएटिव्ह पद्धतीनं लिहिलं आहे. टाटांच्या या पोस्टमधून व्यक्त केलेली भावना जणू त्यांच्या पूर्वजांनी ज्यांनी ही विमान कंपनी स्थापन केली त्यांना अर्पण केली आहे.

आज (२७ जानेवारी) सरकारी मालकीच्या एअर इंडियाची निर्गुंतवणूक प्रक्रिया पूर्ण होऊन त्याचे शंभर टक्के समभाग हे टाटांची मालकी असलेल्या टॅलेस प्रायव्हेट लिमिटेडकडे व्यवस्थापन नियंत्रणासह हस्तांतरीत करण्यात आले. त्यामुळं अखेर अंतिमतः हा व्यवहार पूर्ण झाल्यानं टाटा सन्सचे चेअरमन एन. चंद्रशेखरन यांनी प्रतिक्रिया देताना ‘संपूर्ण समाधान’ असं म्हटलं. तर रतन टाटांनीही आनंद व्यक्त केला.

जेआरडींनी केली होती स्थापनाएअर इंडियाचं मूळ नाव टाटा एअरलाईन्स असं होतं. ज्याची स्थापना सन १९३२ मध्ये भारतरत्न जे.आर.डी. टाटा यांनी केली होती. या कंपनीच्या पहिल्या विमानाचं उड्डाण स्वतः कमर्शिअल पायलट असलेल्या जेआरडींनीच केलं होतं. कराची ते मुंबई असं हे उड्डाण झालं होतं. पुढे दुसऱ्या महायुद्धानंतर तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी या कंपनीचं राष्ट्रीयीकरण केलं आणि तिचं नाव एअर इंडिया असं ठेवण्यात आलं.

ग्लोबल न्युज नेटवर्क: