रामदेव बाबांच्या कोरोना औषधावरून नवा वाद, इंडियन मेडिकल असोसिएशनने उपस्थित केले अनेक प्रश्न

संपूर्ण देशभरात कोरोना संसर्गाने हाहाकार माजवला आहे. त्यात आता बाबा रामदेव यांच्या पतंजली कंपनीने तयार केलेल्या कोरोना प्रतिबंधात्मक औषधाला इंडियन मेडिकल असोसिएशन (IMA) या संस्थेने विरोध दर्शवला आहे. त्यामुळे बाबा रामदेव आता एका नव्या वादाच्या भोवऱ्यात सापडलेले आहेत.

रामदेव यांच्या या औषधाला कुठल्याच मान्यताप्राप्त अधिकृत संघटनेकडून मान्यता मिळाली नाही, ती मिळाली असल्यास तसे सिद्ध करावे, अशीही मागणी ‘आयएमए’ने केली आहे. हा प्रकार पूर्णपणे सर्वसामान्यांची दिशाभूल करणारा व त्यांच्या आरोग्याशी खेळ करणारा आहे.

तसेच लस येण्यासाठी इतक्या महिन्यांचा कालावधी लागलेला असताना, तिथे हे औषध कसे उपलब्ध झाले? त्याला कुणी मान्यता दिली, असे प्रश्न आयएमएने उपस्थित केले आहेत. या औषधाला जागतिक आरोग्य संघटनेने मान्यता दिल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. जयंत लेले यांनी तसा ईमेल पाठवून विचारणा केली असता, या औषधाला अशी कुठल्याही प्रकारची मान्यता दिली नसल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने ट‌्वीट केले आहे.

मात्र इतर कोणत्याही अधिकृत वैद्यकीय मान्यता देणाऱ्या संघटनांनीही मान्यता दिलेली नाही. तरीही अशी चुकीची व दिशाभूल करणारी माहिती का दिली जात आहे, अशा प्रश्न डॉ. लेले यांनी उपस्थित केला आहे.

Team Global News Marathi: