रामाच्या आडून २०२४च्या निवडणुकीचा प्रचार, सामनातून भाजपाला टोला

रामाच्या आडून २०२४च्या निवडणुकीचा प्रचार, सामनातून भाजपाला टोला

राम अयोध्येचा राजा होता. त्याच्या मंदिरासाठी युद्ध झाले. शेकडो कारसेवकांनी आपले रक्त सांडले. बलिदान दिले. त्या अयोध्येच्या रामाचे मंदिर वर्गणीतून बांधायचे? असा परखड सवाल शिवसेनेनं उपस्थितीत केला आहे. तसंच,’श्रीरामाचे भव्य मंदिर हे एखाद्या राजकीय पक्षाच्या राजकीय लाभासाठी बनत नसून ते देशाच्या हिंदू अस्मितेची पताका फडकविण्यासाठी बांधले जात आहे. अशी टीका शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामना अग्रलेखातुन राऊत यांनी भाजपवर केली आहे.

अयोध्येतील राममंदिरासाठी संक्रातीपासून वर्गणीचे काम सुरु होणार आहे. चार लाखांहून अधिक स्वयंसेवक १२ कोटी कुटुंबांसोबत संपर्क साधणार आहेत. हे स्वयंसेवक गावागावांत जातील, असे विश्व हिंदू परिषदेचे चंपतराय यांनी सांगितले आहे.

 

शिवसेनेनं या उपक्रमावर सडकून टीका केली असून भाजपवरही निशाणा साधला आहे. शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनातून शिवसेनेने राम मंदिराच्या वर्गणीसाठी सुरू करण्यात येणाऱ्या संपर्क अभियानावर प्रश्नचिन्ह उपस्थित केला आहे.

‘मर्यादा पुरुषोत्तम रामाचे मंदिर हे देशाच्या अस्मितेचे मंदिर आहे व त्यासाठी जगभरातील हिंदुत्ववाद्यांनी आधीच खजिना रिकामा केला आहे. त्यामुळे घरोघरी जाऊन वर्गणी गोळा करून काय साध्य करणार? चार लाख स्वयंसेवकांची नेमणूक त्याकामी झाली असेल तर त्या स्वयंसेवकांची पालक संघटना कोणती, हे स्पष्ट झाले तर बरे होईल.

 

वर्गणीच्या नावाखाली हे चार लाख स्वयंसेवक एखाद्या पक्षाचे राजकीय प्रचारक म्हणून घरोघर जाणार असतील तर मंदिरासाठी रक्त सांडलेल्या प्रत्येक आत्म्याचा तो अवमान ठरेल,’ असे म्हटले आहे.

ग्लोबल न्युज नेटवर्क: