“राहुल गांधी आधुनिक काळातील मोहम्मद अली जिना”

 

नवी दिल्ली | काँग्रेसचे नेते राहुल गांधी आणि आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वासरमा यांचात सध्या शाब्दिक चकमक सुरु आहे. ‘तुम्ही राजीव गांधींचे पुत्र आहात की नाही याचा पुरावा आम्ही कधी तुमच्याकडे मागितला का?’ असा वादग्रस्त प्रश्न मुख्यमंत्री हेमंत बिस्व शर्मा यांनी विचारला. त्यांच्या या सवालावरुन आता नवा वाद सुरू आहे. त्यातच आता पुन्हा एकदा सरमा यांनी वादग्रस्त विधान केलंय. राहुल गांधी हे आधुनिक काळातील मोहम्मद अली जिना आहेत, असे म्हणत सरमा यांनी टीका केली आहे.

प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना मुख्यमंत्री सरमा यांनी हे वक्तव्य केले आहे. ‘आमचे लष्करी जवान शत्रूच्या प्रदेशात कोणत्याही कारवाईसाठी जाण्यापूर्वी एक महिन्यासाठी योजना आखतात, या धोरणात्मक कारवाया असतात आणि कारवाई झाल्यानंतर प्रेस रिलीझ जारी केले जाते, त्यानंतर आम्हाला कळते. जर कोणी कारवाईचा पुरावा मागत असेल तर असा पुरावा मागितल्यावर लष्कराच्या जवानाला किती वेदना होतात याचा विचार करा.

‘राहुल गांधींना असे वाटते की भारतात गुजरात ते पश्चिम बंगालचा समावेश आहे, गेल्या दहा दिवसांपासून मी असे प्रकार पाहतोय. एकदा त्यांना भारत राज्यांचा संघ वाटतो, तर दुसऱ्यांदा भारतात केवळ गुजरात ते बंगालपर्यंत आहे. ते वाटेत ते बोलताहेत म्हणून मी म्हणतोय की राहुल गांधींमध्ये जिनांचं भूत शिरलंय. जिना जी भाषा १९४७ पूर्वी वापरत असत ती आता राहुल गांधी वापरत आहेत. एक प्रकारे राहुल गांधी आधुनिक काळातील जिना आहेत,’ असे सरमा म्हणाले.

Team Global News Marathi: