देशातील नागरिकांना संकटात टाकून लसींची होणारी निर्यात तत्काळ रोखा-राहुल गांधीची मागणी

देशात लसींचा तुटवडा असताना 84 देशांना 6.50 कोटी डोस!
देशातील नागरिकांना संकटात टाकून लसींची होणारी निर्यात तत्काळ रोखा

ग्लोबल न्यूज: महाराष्ट्राला आठवडय़ाला 40 लाख लसींची गरज असताना केंद्रातील मोदी सरकारने केवळ साडेसात लाख लसी दिल्या. राजस्थान, ओडिशातही तुटवडा आहे. आपल्या देशातील नागरिकांना लस मिळत नसताना केंद्र सरकारने मात्र 84 देशांना तब्बल 6.50 कोटी लसींचे डोस निर्यात केल्याची माहिती केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनीच आपल्या आकडेवारीत दिली आहे.

 

हिंदुस्थानकडून कोविशिल्ड आणि कोवॅक्सिन या लसींचे डोस इतर देशांना निर्यात करण्यात आले. धक्कादायक म्हणजे 6.45 कोटी डोसमधील तब्बल 3.58 कोटी डोस 44 देशांना कर्मशियल कंत्राटाखाली देण्यात आली आहे. देशातील आपल्या जनतेला लस मिळत नसताना इतर देशांना कशासाठी एवढे डोस निर्यात केले? असा प्रश्न उपस्थितीत होत आहे.

24 तासांत 36 लाख 91 हजार जणांना लस

ठळक बातम्या : IPL2021 मुंबईच्या पराभवाची ‘नवमी’, नोंदवला नकोसा विक्रमपुणे हादरले, आयटी कंपनीतील तरूणीवर कॅब चालकाचा बलात्कार; फोटो व्हायरल करण्याची धमकीहलगर्जीपणा करु नका; लोकांचे जीव वाचवण्यासाठी कोरोना साखळी तोडणे गरजेचे!आरती-मानसीचा दुबईत डंका, आंतरराष्ट्रीय पॅरा बॅडमिंटन स्पर्धेत पटकावले कास्य पदकमिनी लॉकडाउन सुरू! घरातच बसा, कारवाई टाळा; फक्त ‘यांना’आहे प्रवासासाठी परवानगीपश्चिम बंगालमध्ये मतदानावेळी हिंसा, CISF च्या गोळीबारात चार जणांचा मृत्यू गेल्या 24 तासांत देशातील 36 लाख 91 हजार जणांना लस देण्यात आली.

गेल्या आठवडय़ात एकाच दिवशी 43 लाख लोकांना लस देण्यात आली होती, अशी माहिती डॉ. हर्ष वर्धन यांनी दिली.आतापर्यंत 89 लाख आरोग्य कर्मचाऱयांना पहिला डोस तर 54 लाख आरोग्य कर्मचाऱयांना दुसरा डोस दिला आहे. 98 लाख प्रंटलाइन वर्कर्सला पहिला तर 45 लाख प्रंटलाइन वर्कर्सना दुसरा डोस मिळाला. 45 ते 49 वयोगटातील 2 कोटी 61 लाख जणांना पहिला, तर 5 लाख 23 हजार लोकांना दुसरा डोस दिला. 60 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या 3 कोटी 75 लाख लोकांना पहिला तर 13 लाख लोकांना दुसरा डोस दिला आहे.

निर्यात रोखा! लसींची कमतरता अतिगंभीर समस्या; ‘उत्सव’ नाही

वाढत्या कोरोना संकटात लसींची कमतरता ही एक अतिगंभीर समस्या आहे, हा ‘उत्सव’ नाही. आपल्या देशातील नागरिकांना संकटात टाकून लसींची होणारी निर्यात तत्काळ रोखा अशी मागणी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केली आहे. राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून लसीकरण मोहिमेतील गंभीर त्रुटींकडे लक्ष वेधले आहे. पेंद्र सरकारने पक्षपातीपणा न करता सर्व राज्यांना मदत केली पाहिजे. आपण सर्वांनी एकत्र येऊन या महामारीला हरवायचे आहे. मात्र, केंद्रीय आरोग्य मंत्र्यांकडून विरोधी पक्षांच्या ताब्यातील राज्यांना टार्गेट केले जात आहे असा थेट आरोप राहुल गांधींनी या पत्रात केला आहे.

जास्तीत जास्त लोकांना लस देणे गरजेचे आहे. पण त्यासाठी त्रुटी दूर करून लसीकरण मोहिम वेगात राबविली पाहिजे. देशात लसींची टंचाई असताना विदेशात साडेसहा कोटी डोस निर्यात करण्याची गरज होती का? असा सवालही त्यांनी केला आहे.

ग्लोबल न्युज नेटवर्क: