“पुतीन जो बायडेन यांना ढोलसारखे वाजवत आहेत’, मी राष्ट्राध्यक्ष असतो, तर.”

 

सध्या तिसऱ्या महायुद्धाची सुरुवात झाली असल्याचे दिसत आहे, कारण रशिया आणि युक्रेन यांच्यामध्ये युद्ध सुरू असून रशियाने युक्रेनची राजधानी कीववर ताबा मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहे. तर या युद्धजन्य परिस्थतीत अमेरिकेने उडी घेतली आहे. अमेरिकेकडून युक्रेनला तब्बल ३५० मिलियन डॉलर्सची आर्थिक मदत देखील करण्यात आली आहे. मात्र, या सगळ्या गंभीर परिस्थितीमध्ये अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जो बायडेन यांच्यावर खोचक शब्दांमध्ये निशाणा साधला आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांनी याआधी युक्रेनवर हल्ला केल्याच्या रशियाच्या कृतीला ‘हुशार चाल’ म्हणत त्याचे कौतुक केले होते. तसेच व्लादिमिर पुतीन यांची बाजू घेतली होती. पण २४ तासांच्या आत त्यांनी आपली भूमिका बदलून रशियावर टीका केली आहे आणि युक्रेनची बाजू घेतली आहे. ‘युक्रेनवर हल्ला करण्याची रशियाची कृती पूर्णपणे चुकीची आहे. हे आंतरराष्ट्रीय नियमांचं उल्लंघन आहे. हे अजिबात घडायला नको होतं. आम्ही युक्रेनच्या जनतेसाठी प्रार्थना करतो’, असे ट्रम्प म्हणाले आहेत.

अशातच डोनाल्ड ट्रम्प पुन्हा एकदा आपल्या बायडेन विरोधावर घसरले. ‘माझ्या कार्यकाळात युद्ध झालं नाही. मी आपल्याला युद्धातून बाहेर काढलं. कमकुवत राष्ट्राध्यक्षामुळे हे जग कायमच भितीच्या सावटाखाली असणार आहे. व्लादिमिर पुतीन हे जो बायडेन यांना एखाद्या ढोलसारखे वाजवत आहेत’, असे डोनाल्ड ट्रम्प म्हणाले आहेत.

Team Global News Marathi: