पुन्हा एकदा शरद पवारांनी साधला केंद्रातील मोदी सरकारवर निशाणा

 

लाल किल्ल्यावर भाषण करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महिलांच्या सुरक्षेबाबत, सन्मानाबाबत वक्तव्य केलं. मात्र, दुसऱ्याच दिवशी गुजरातमध्ये भाजपच्या सरकारानं बिल्कीस बानोच्या गुन्हेगारांची शिक्षा कमी करण्याचं काम केल्याचे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलं आहे.

2014 मध्ये घरगुती गॅसचे दर हे 410 रुपयांवर होते ते आज 1000 रुपयांवर गेले आहेत. तसेच पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती आज 100 रुपयांच्या पुढे गेल्या आहेत. याचा परिणाम सर्व व्यवसायांवर झाला आहे. तसेच याचा परिणाम कृषी आणि उद्योगांवर झाला असल्याचे पवार म्हणाले. रोजगार कमी झाले असल्याचेही पवार म्हणाले.

शेतकऱ्यांवर कोणतही संकट आल्यानंतर आपल्याला सतर्क राहणं गरजेचं आहे. शेतकऱ्यांसाठी लढण्याची तयारी ठेवली पाहिजे असेही शरद पवार यावेळी म्हणाले. सांप्रदायिक शक्तिविरोधात लढण्यासाठी आपण सर्वांनी एकत्र यायला हवं असेही शरद पवार म्हणाले. आज देशातील नागरिकांसमोर वाढती महागाई ही मोठी समस्या आहे. महागाईचा दर वाढला आहे. पेट्रोल, डिझेल, खायच्या वस्तूंचे दर वाढले आहेत. याचा परिणाम अर्थव्यवस्थेवर होत असल्याचे पवार म्हणाले.

Team Global News Marathi: