पुणे पोलीस अकॅशन मोडमध्ये: गुंड मारणे-मोहोळ पाठोपाठ गॅंगस्टर निलेश घायवळलाकेली अटक

ग्लोबल न्यूज:  :  कुख्यात गुंड गजा मारणेच्या मुसक्या आवळल्यानंतर पुणे पोलीस अॅक्शन मोड दिसून येत आहे. पुणे पोलिसांनी गुंड गजा मारणे नंतर शरद मोहोळच्या देखील मुसक्या आवळल्या होत्या. दरम्यान, आता पुणे पोलिसांनी आणखी (Pune Police Arrest Gangster Nilesh Ghaiwal) एका कुख्यात गुंडाच्या मुसक्या आवळल्या आहेत. निलेश घायवळला पुणे शहर पोलिसांनी अटक केली आहे. गॅंगस्टर निलेश घायवळला मोक्काच्या गुन्ह्यात अटक करण्यात आली असून, त्याच्यावर पुणे, पिंपरी-चिंचवडसह जिल्ह्यात विविध प्रकारचे १४ गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर येत आहे.

पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी केलेल्या कारवाईमुळे गुन्हेगारी क्षेत्रात खळबळ

गेल्या काही दिवसांपासून पुणे पोलिसांनी गुन्हेगारी क्षेत्रातील अनेक गुंडांना ताब्यात घेतलं असून, त्यांच्यावर खटले दाखल केले आहेत. पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी केलेल्या कारवाईमुळे गुन्हेगारी क्षेत्रात खळबळ माजली आहे. दरम्यान, निलेश घायवळच्या संपूर्ण टोळीवर पुणे पोलिसांनी मोक्काअंतर्गत कारवाई केली आहे. येरवडा कारागृहातूनच पुणे पोलिसांनी निलेश घायवळवर अटकेची कारवाई केली आहे.

निलेश घायवळ याच्यावर स्थानबद्धतेची कारवाई

पुणे ग्रामीण पोलिसांनी निलेश घायवळ याच्यावर स्थानबद्धतेची कारवाई करत येरवडा कारागृहात रवानगी केली होती. निलेश बन्सीलाल घायवळ, संतोष आनंद धुमाळ, मुसाब एलाही शेख अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

शरद मोहोळला दोन महिन्यांसाठी वास्तव्य करण्यास आणि प्रवेश करण्यास मनाई

पुणे पोलिसांनी केलेल्या कारवाईनुसार, शरद मोहोळला पुढील दोन महिने पुणे शहरात राहण्यास बंदी घालण्यात आली असल्याची माहिती समोर आली आहे. पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी याबाबतचे आदेश काढले आहेत की, शरद मोहोळला दोन महिन्यांसाठी वास्तव्य करण्यास आणि प्रवेश करण्यास मनाई केली असणार आहे. या आदेशामुळे ताज्या प्रकरणात जामीन मिळाला तरी शरद मोहोळ पुण्यात थांबू शकणार नाही आणि जामीन मिळाला नाही तर शरद मोहोळला कोठडीत दिवस काढावे लागतील. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार प्रतिबंधात्मक कारवाईची मुदत आवश्यकतेनुसार वाढवली जाऊ शकते.

कातील सिद्दिकीच्या खुनातून शरद मोहोळची मुक्तता

शरद मोहोळ हा एक गुंड व्यक्ती असून, काही दिवसांपूर्वीच शहरातला मोहोळ टोळीचा म्होरक्या असणाऱ्या शरद मोहोळ याची कथित सिद्दिकीच्या खुनातून मुक्तता झाली होती. शरद मोहोळ याची खुन प्रकरणातून मुक्तता झाल्यानंतर त्याने देखील गजा मारणे टोळीसारखाच गाजावाजा केला होता. मात्र त्यावेळी पुणे पोलिसांनी काहीही कारवाई केली नव्हती. परंतु, गजा मारणे याच्यावर कारवाई केल्यानंतर पोलिसांनी ही मोठी कारवाई केली आहे.

या कलमानुसार शरद मोहोळ करण्यात आली कारवाई

शरद मोहोळ याच्यावरती कलम १४३, १८८, ३७ (३) अंतर्गत फौजदारी कायदा दुरुस्ती अधिनियम, ५१ बी आपत्ती व्यवस्थापन अधिनियम कलम ७ अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे. दरम्यान, गुंड शरद मोहोळ याने २६ जानेवारी रोजी एका कार्यक्रमाला हजर राहिला त्या कार्यक्रमात त्याच्या साथीदारांनी धिंगाणा केला असल्याची माहिती आहे. त्यावरुन खडक पोलीस ठाण्याच्या हद्दीत मोहोळ याच्यासह १० ते १२ जणांवर गुन्हा दाखल केला आहे.

ग्लोबल न्युज नेटवर्क: