पुण्याच्या दिशने विमान टॅक ऑफ घेताना प्रवासी म्हणाला मला कोरोना झाला, उडाला एकचं गोंधळ

दिल्ली : दिल्ली वरून पुण्याच्या दिशेने उडणाऱ्या इंडिगो कंपनीच्या विमानामध्ये एकचं गोंधळ उडाला होता. दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या धावपट्टीवरुन पुण्यासाठी विमान टेक-ऑफ घेत असताना इतक्यात एक प्रवाशी ओरडला त्यामुळे एकचं गोंधळ उडाला होता.

एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार, चार मार्च रोजी संध्याकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास पुण्याला जाणारं इंडिगो विमान टेक-ऑफ करणार त्यात विमानात प्रवास करणाऱया प्रवाशाने स्वतःला करोनाची लागण झाली आहे असे विमान कर्मचाऱ्याला कळविले होते.
त्यानंतर तातडीने याबाबतची माहिती विमानाच्या पायलटला देण्यात आली , त्यानेही तात्काळ पावलं उचलत विमान टॅक्सी पार्किंगच्या दिशेने वळवण्यात आले. तिथे विमानातील सर्व प्रवाशांना उतरवण्यात आलं, करोनाची लागण झाल्याचे सांगणाऱ्या प्रवाशालाही तिथे उतरवण्यात आले.

मात्र करोना झाल्याचा दावा करणाऱ्या प्रवाशाला विमानतळ वैद्यकीय प्राधिकरणाकडे सोपवण्यात आले, तिथे त्याचा रिपोर्ट करोना पॉझिटिव्ह आला, असे इंडिगोच्या अधिकाऱ्याने सांगितले. या दरम्यान विमानात स्वच्छता करण्यात आली, शिवाय सीटचे कव्हर्सही बदलण्यात आले. त्यामुळे विमानाला उड्डाण घेण्यास दोन तास उशीर झाला.

Team Global News Marathi: