दिल्लीत राजकारण तापणार: प्रियांका गांधी वढेरा यांना सरकारी बांगला सोडण्याचे आदेश

प्रियांका गांधी वढेरा यांना सरकारी बांगला सोडण्याचे आदेश

चीनच्या मुद्यावरून काँग्रेस आणि भारतीय जनता पक्षात चांगलेच शीत युद्ध पेटलेले दिसून येत आहे. एकीकडे चीनने दोन्ही पक्षांला दिलेल्या आर्थिक मदतीबाबत एकमेकांवर आरोपप्रत्यारोपाच्या फेऱ्या वाढलेल्या आहेत. त्यातच आता केंद्रात सत्तेत असलेल्या भाजपाने काँग्रेस पक्षाला आणखी एक दणका दिल्याचे समोर आले आहे.

कॉंग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी वढेरा यांना एक महिन्याच्या आत सरकारी बंगला खाली करावा अशी नोटीस केंद्र सरकारने त्यांना पाठवली आहे. लोधी रोड येथील सरकारी बंगला क्रमांक 35 हा बंगला प्रियंका गांधींना देण्यात आला होता. केंद्राच्या आदेशाप्रमाणे त्यांना हे सरकारी घर एक महिन्याच्या आत रिकामे करावे लागणार आहे. या निर्णयावर काँग्रेस पक्षातर्फे काही प्रतिक्रिया आलेली नाही.

मागील वर्षी प्रियंका गांधी यांची विशेष सुरक्षा काढून त्यांना Z+ सुरक्षा देण्यात आली होती. नियमांनुसार सुरक्षा व्यवस्था पुरवताना विशेष सुरक्षा पुरवली जाईल त्याला सरकारी बंगल्याची तरतूद आहे. मात्र, झेड सुरक्षा व्यवस्थेत सरकारी निवासस्थानाची तरतूद नाही. याचाच आधार घेऊन प्रियंका गांधी यांना ही नोटीस देण्यात आली आहे.

ग्लोबल न्युज नेटवर्क: