पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टोचून घेतली कोरोनाची लस

देशभरात पुन्हा एकदा कोरोनाने आपला डोकं वर काढलं होत. त्यामुळे पुन्हा एकदा देशात चिंतेचे वातावरण पसरले होते. तर दुसरकीकडे वैद्यकीय आणि आरोग्यसेवक कर्मचाऱ्यांना कोरोना लसीचा पहिला डोस देण्याचे काम युद्ध पातळीवर सुरु आहे.

त्यातच आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोना लस टोचून घेतल्याची माहिती समोर आली आहे. दिल्लीच्या एम्स रुग्णालयात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कोरोना लसीचा पहिला डोस देण्यात आला आहे. या संदर्भातील माहिती ANI वृत्तवाहिनीने प्रसिद्ध केली आहे.

मागच्या अनेक दिवसांपासून कोरोना लस सुरक्षित आहे की नाही यावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत होते. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना प्रथमता लस टोचून घ्यावी अशी मागणी विरोधकांनी केली होती. त्या टिकेला आता पंतप्रधान मोदी यांनी लस घेऊनच प्रतिउत्तर दिले आहे

Team Global News Marathi: