महिलांच्या सुरक्षितेसाठी सरकारची ही योजना, करा ‘या’ नंबरवर कॉल

देशात दिवसेंदिवस महिलांवर होणाऱ्या अत्याचाऱ्यांच्या घटना वाढताना दिसत आहे. या घडणाऱ्या घटनांना आळा घालण्याचे मोठे आव्हान सरकारपुढे निर्माण झाले आहे. त्यात महिलांवरील अत्याचाऱ्यांच्या घटना रोखण्यासाठी आता केंद्र सरकारने ‘हे’ महत्वाचे पाऊल उचलले आहे.

सरकारने महिला सशक्तिकरण राष्ट्रीय धोरण २० मार्च २००१ रोजीपासून राबवण्यास सुरुवात केली आहे. या धोरणाचे मूळ उद्दीष्ट म्हणजे स्त्रियांसह सर्व प्रकारच्या भेदभावाचा अंत करणे. महिला सक्षमीकरणासाठी केंद्र सरकारने देशभरात अनेक योजना चालवल्या आहेत. आज जरी सर्व सुविधा उपलब्ध असल्यातरी महिलांवरील अत्याचार थांबण्याचे काही नाव घेत नाही.

त्यामुळे सरकारने हे पाऊल उचलले आहे. महिलांना मदत मिळण्यासाठी सरकारने हेल्पलाइन नंबर जारी केले आहे. या नंबरवर फोन केल्यानंतर महिलांना तात्काळ मदत देण्यात येईल. महिला हेल्पलाईन नंबर १०९१/१०९० हा संपूर्ण देशासाठी जारी करण्यात आला आहे.

Team Global News Marathi: