पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व राज्यातील मुख्यत्र्यांशी साधला संवाद, दिला तिसऱ्या लाटेपासून सतर्क राहण्याचा इशारा !

 

नवी दिल्ली | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व राज्यातील मुख्यमंत्र्यांशी संवाद साधत युरोपात होत असलेल्या कोरोना संसर्गाच्या रुग्ण वाढीवरून राज्यात सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे. सध्या पूर्वेकडील देशातही कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. हा आपल्यासाठी धोक्याचा इशाराच आहे, असं सांगतानाच कोरोनाची तिसरी लाट आपल्याही दाराशी आली आहे. त्यामुळे सावध राहा. काळजी घ्या, उपाययोजना करा, असा इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना दिला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज तामिळनाडूचे मुख्यमंत्री स्टॅलिन, ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक, आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री वायएस जगन मोहन रेड्डी, कर्नाटक बी. एस. येडियुरप्पा, केरळचे मुख्यमंत्री पीनराई विजयन आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी संवाद साधला. याप्रसंगी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंहही उपस्थित होते.

यावेळी पंतप्रधान मोदी यांनी कोरोनाच्या तिसऱ्या लाटेपासून सतर्क राहण्याच्या सूचना केल्या. कोरोना संकटाच्या काळात सर्वच राज्य सरकारांनी एकमेकांपासून अनेक गोष्टी शिकण्याचा प्रयत्न केला. आता आपण तिसऱ्या लाटेच्या टप्प्यावर उभे आहोत. तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. काही राज्यात कोरोनाची रुग्णसंख्या अजूनही वाढत आहे. हा चिंतेचा विषय आहे, असं मोदी म्हणाले.

Team Global News Marathi: