पंतप्रधान नरेंद्र मोदींची लोकप्रियता वर्षभरात ६६ टक्क्यावरुन २४ टक्क्यांपर्यंत घसरली !

 

नवी दिल्ली | जगात तसेच देशात कोरोना महामारीमुळं संकट उभं राहिलं आहे. या संकटामुळे आरोग्य व्यवस्थेचा संपूर्ण बोजवारा उडाल्याचं चित्र देशात पाहायला मिळालं. अनेक ठिकाणी ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे लोकांचा जीव गेला. देशात शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू होते. या विविध घटनांमध्ये एका इंग्लिश वृत्तवाहिनीने घेतलेल्या सर्व्हेतून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची लोकप्रियता ६६ टक्क्यावरुन २४ टक्क्यांवर आल्याचं म्हटलं आहे.

इंडिया टूडे मूड ऑफ द नेशन पोलच्या सर्व्हेतून हे समोर आलं आहे. या सर्व्हेत विचारण्यात आलं होतं की, भारतासाठी पुढील पंतप्रधान कोण असावा? यावर ऑगस्ट २०२१ मध्ये फक्त २४ टक्के लोकांनी नरेंद्र मोदी यांच्या नावाला पसंती दिली. तर जानेवारी २०२१ मध्ये याच प्रश्नाला ३८ टक्के लोकांनी मोदींच्या नावाला पसंती दिली होती.

तसेच मागील ऑगस्ट २०२० मध्ये पंतप्रधानपदासाठी नरेंद्र मोदी यांच्या नावाला ६६ टक्के लोकांनी पसंती दिली होती. भाजपाचे फायर ब्रँड नेते असतानाही नरेंद्र मोदी यांची लोकप्रियता कमी झाली असली तरी भाजपाशी संबंधित दोन बड्या नेत्यांच्या लोकप्रियतेत वाढ झाल्याचं दिसून आलं आहे.

Team Global News Marathi: