पंतप्रधान मोदींचा आज केदारनाथ दौरा; करणार विविध कामांचा शुभारंभ

 

उत्तराखंड | पंतप्रधान नरेंद्र मोदी आज उत्तराखंडच्या केदारनाथ दौऱ्यावर जाणार असून त्यानिमित्तानं केदारनाथच्या परिसरात कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. दिवाळीच्या निमित्ताने केदारनाथ मंदिराला फुलांनी सजावट केली जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी केदारनाथ मंदिरात पूजा करतील. त्यानंतर श्री आदि शंकराचार्य समाधीचे उद्घाटन आणि श्री आदि शंकराचार्यांच्या मूर्तीचे अनावरण करतील. या दौऱ्यात पंतप्रधान मोदी हे भाषणही करणार आहेत.

प्रधानमंत्री संबोधनाचे ८७ एलईडी स्क्रीन आणि बिग स्क्रीनवर प्रसारित करण्यात येणार आहे. श्री आदि शंकराचार्य मंदिरात पोहचण्याचा मार्गावर ८७ मंदिरात भाजपचे प्रमुख नेते उपस्थित असणार आहे. केदरनाथधाम यात्रेच्या क्षणाला ऐतिहासिक करण्यासाठी भाजपने एक राष्ट्रव्यापी योजना बनवली आहे. चार धाम, बारा ज्योतिर्लिंग आणि प्रमुख मंदिरे असे मिळून एकूण ८२ मंदिरात साधू, भक्तांना आणि नागरिकांना आमंत्रित केले होते.

२०१३ मध्ये आलेल्या नैसर्गिक आपत्तीनंतर पंतप्रधानांनी केदारनाथमध्ये पुन्हा विकासकार्य सुरु करण्याची इच्छा व्यक्त केली होती. परंतु, त्यावेळी परवानगी मिळाली नव्हती. त्यानंतर पंतप्रधान झाल्यावर मोदींनी सलग केदारनाथचे दैरे केले आहेत आणि कोट्यवधी रुपयांचा खर्च करुन नवं केदारपुरी वसवण्याचा संकल्प घेतला होता. या अनुषंगानं काम सुरु आहे. नव्या केदारपुरी निर्माणाचं काम जवळपास ९० टक्क्यांपर्यंत पूर्म झालं आहे. तसेच, सहा नोव्हेंबर रोजी केदारनाथची दारंही बंद होणार आहेत.

Team Global News Marathi: