पंतप्रधान व मुख्यमंत्र्यांनी उत्तर प्रदेशला कुपोषणात नंबर वन बनवलं

पंतप्रधान व मुख्यमंत्र्यांनी उत्तर प्रदेशला कुपोषणात नंबर वन बनवलं

उत्तरप्रदेश | उत्तरप्रदेश विधपंतप्रधान व मुख्यमंत्र्यांनी उत्तर प्रदेशला कुपोषणात नंबर वन बनवलंनसभा निवडणुकीला अवघे काही महिने शिल्लक राहिलेले असताना उत्तरप्रदेशातील राजकीय वातावरण चांगलेच तापू लागले आहे. त्यातच भारतीय जनता पक्षाला सत्तेतून खाली उतरवण्यासाठी सर्वच विरोधी पक्षांनी मोर्चे बांधणी सुरु केली आहे. त्यातच आता काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांनी पुन्हा एकदा राज्यातील कुपोषणाच्या मुद्द्यावरून पंतप्रधान मोदी आणि योगी सरकारवर निशाणा साधला आहे.

ते आपल्या ट्विटमध्ये म्हणता की, “संसदेत भाजपा सरकारच्या मंत्र्याने सांगितले की, देशात सर्वाधिक कुपोषित मुलं (जवळपास 4 लाख) उत्तर प्रदेशमध्ये आहे. पंतप्रधान व मुख्यमंत्री स्वतःच स्वतःला नंबर वन म्हणत आले आहेत आणि “डबल इंजिन”ची फसवाफसवी करून कुपोषणात उत्तर प्रदेशला नंबर वन बनवलं” अशा शब्दांत प्रियंका यांनी जोरदार टीका केली आहे.

यापूर्वी सुद्धा कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी मोदी-योगी सरकारवर निशाणा साधला होता. “कोरोना संकटाच्या काळात सरकारने ऑक्सिजनच्या निर्यातीत ७००% वाढ केली. त्यामुळे मृत्यू झाले. तसेच ऑक्सिजनची वाहतूक करण्यासाठी सरकारने टँकरची व्यवस्था केली नव्हती. सशक्त गट आणि संसदीय समितीच्या सल्ल्याकडे सरकारने दुर्लक्ष करून ऑक्सिजन देण्याची कोणतीही व्यवस्था केली नव्हती. रुग्णालयांमध्ये ऑक्सिजन प्लांट बसविण्याबाबत कोणतीही सक्रियता दाखवली नाही” असं प्रियंका गांधी यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं होतं.

Team Global News Marathi: