शेतकऱ्याला राग अनावर होऊन थेट रस्त्यातच भाजपा नेत्यांचे कपडे फाडले !

 

मोदी सरकारने पारित केलेल्या नव्या कृषी कायद्याविरोधात शेतकरी अनेक ठिकणी आंदोलन करत आहे तसेच पारित केलेल्या कायद्याविरोधात शेतकऱ्यांचा केंद्रातील भाजपा सरकारवर वेळोवेळी राग दिसून आला आहे. त्यातच राजस्थानमध्ये शेतकऱ्याने पुकारलेल्या मोदी सरकार विरोधातील आंदोलनात सामील होण्यासाठी आलेल्या भाजपा नेत्यांचे शेतकऱ्यांनी कपडे फाडले आहे.

हुमानगडचे भाजप कार्यकर्ता आणि एसीसी मोर्चाचे अध्यक्ष कैलाश मेघवाल यांचे शेतकऱ्यांनी कपडे फाडले.
कैलाश मेघवाल यांचे कपडे फाडल्याच्या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली. यानंतर घटनास्थळी पोलिसांनी धाव घेत कैलाश मेघवाल यांची सुटका केली. यानंतर पोलिसांनी घटनास्थळी सौम्य लाठी चार्ज केला. यात काही शेतकरी जखमी झालेत.

एका आठवड्यात दुसऱ्यांदा आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांनी भाजप नेत्यांवर हल्ला केल्याची घटना घडली आहे. यामुद्द्यावरून राजस्थानमधील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. भाजप राजस्थान एससी मोर्चाचे प्रदेश अध्यक्ष कैलाश मेघवाल यांच्यावर हल्ला हा राजस्थानातील कायद्याच्या व्यवस्थेची वास्तविक स्थिती व्यक्त करतो. या हल्ल्याचा जितका निषेध केला जावा तितका कमी आहे, अशी टीका त्यांनी केली आहे.

 

Team Global News Marathi: