चेंबूर, विक्रोळीतील घटनेवर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी व्यक्त केलं दुःख

 

मुंबई | मुंबईत रात्रभर पडणाऱ्या धो-धो पावसामुळे संपूर्ण शहर जलमय झाले आहे. मुंबईच्या अनेक सखल भागात पाणी साचले आहे. तसेच पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे एका रात्रीत मुंबईत दोन दुर्घटना घडल्या. या दोन्ही दुर्घटनेत २१ जणांचा मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेवर देशाचे राष्ट्रपती रामनाथ कोविद यांनी शोक व्यक्त केला आहे.

राष्ट्रपती म्हणाले, “मुंबईतील चेंबूर आणि विक्रोळीमध्ये मुसळधार पावसामुळे झालेल्या दुर्घटनेत काहींचा मृत्यू, तर काही जण जमी झाल्याचे ऐकूण अत्यंत दुःख झाले. शोकग्रस्त कुटुंबींयांप्रती मी संवेदना व्यक्त करतो. तसेच मदत आणि बचाव कार्य पूर्णपणे यशस्वी व्हावे यासाठी प्रार्थना करतो.” असे ट्विट त्यांनी केले आहे.

मुंबईमध्ये शनिवार रात्रीपासून सुरू असलेल्या पावसामुळे विक्रोळी भागातही एक इमारत कोसळल्याची घटना घडली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, या घटनेत ५ जणांचा मृत्यू झाला तर ५ ते ६ लोक अडकल्याची शक्यता आहे. तसेच, भांडूप पंपिंग स्टेशनच्या भिंतीचा काही भाग कोसळून एकाचा मृत्यू आणि काही जण जखमी झाल्याचे समजते.

 

Team Global News Marathi: