मुंबईत नाईटक्लबवर पोलिसांची कारवाही सुरेश रैनासह अनेक सेलिब्रेटींवर गुन्हा दाखल

मुंबईत नाईटक्लबवर पोलिसांची कारवाही सुरेश रैनासह अनेक सेलिब्रेटींवर गुन्हा दाखल

ग्लोबल न्युज: मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर असलेल्या ड्रॅगनफ्लाय पबवर धाड टाकून मुंबई पोलिसांनी मोठी कारवाही केली आहे. या कारवाहीत सेलिब्रेटींना चांगलाच दणका दिला आहे. या पबमध्ये कोरोना नियमांची पायमल्ली केल्याच्या आरोपावरून क्रिकेटपटू सुरेश रैना, अभिनेता ऋतिक रोशनची पत्नी सुझेन खानसह ३४ सेलिब्रेटींविरोधात कलम १८८ अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

मुंबईच्या सहार पोलिसांनी सोमवारी मध्यरात्री अडीच वाजेच्या सुमारास ड्रॅगनफ्लाय पबवर धाड टाकली, तेव्हा पबमध्ये असलेल्या सुरेश रैना, सुझेन खानसह अन्य ३४ सेलिब्रेटींपैकी कुणीही मास्क लावलेला नव्हता. सोशल डिस्टन्सिंगचाही फज्जा उडवलेला होता. त्याच प्रमाणे वेळेची मर्यादाही पाळण्यात आली नव्हती. त्यामुळे या सेलिब्रेटींविरोधात भादंविच्या कलम १८८,२६९ आणि ३४ अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या पबमध्ये अनेक दिग्गजांसह बॉलीवूडच्या सेलिब्रेटी होत्या, असे सूत्रांनी सांगितले.

ब्रिटनमध्ये आढळलेल्या कोरोनाच्या नव्या विषाणूमुळे जगभर दहशतीचे वातावरण निर्माण झालेले आहे. महाराष्ट्रातही महापालिका हद्दीत आज रात्रीपासून संचारबंदी लागू करण्यात आली आहे. मुंबईमध्ये सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण आढळून आलेले असताना कोरोना नियमांची पायमल्ली करत हे सेलिब्रेटी रात्री उशिरापर्यंत पार्टी झोडत होते.

ग्लोबल न्युज नेटवर्क: